
बीड: छत्रपती संभाजीराजे बीड दौऱ्यावर असताना त्यांनी भागातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शिवारांना भेट देऊन पाहणी केली. या भेटीत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह बीडचे जिल्हाधिकारी श्री राधाबिनोद शर्मा यांची भेट घेतली. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या ५ दिवसांतमध्ये ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात महिला शेतकरी व युवा शेतकऱ्यांचाही समावेश आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशा भावना व्यक्त करीत पंचनाम्यामध्ये वेळ न घालता दिवाळीच्या अगोदर विशेष बाब म्हणून सरसकट १००% पीकविमा मंजुर करण्यात येण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आदेश काढावा, याविषयी संभाजीराजे यांनी यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांच्याशी चर्चा केली.सोबतच NDRF व SDRF च्या निकषांनुसार तातडीने अनुदान द्यावे. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत मिळणारे २,००० रुपये KYC मुळे रखडले आहेत ते शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावेत, तसेच काही शेतकऱ्यांना हे २००० रुपये मिळून देखील बॅंकेने त्यांची खाती होल्ड केलेली आहेत ती अनहोल्ड करावीत, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी केली.या मागणीवर जिल्हाधकाऱ्यांनी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी छत्रपती संभाजीराजे स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव, गंगाधर काळकुटे, शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे व शेतकरी बांधव उपस्थित होते.
Leave a Reply