
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना- २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा बँकेशी सलग्न असलेल्या एकूण तीन लाख, एक हजार, २८० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात एक लाख, १३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर ४०९ कोटी प्रोत्साहनपर लाभ अनुदान जमा झाले आहे.
Leave a Reply