खा. धनंजय महाडिक आयोजित फराळ स्नेहमिलन कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

 

कोल्हापूर: दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांमध्ये स्नेहाचे बंध निर्माण व्हावेत आणि परस्पर संवाद वाढीस लागावा, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने फराळ स्नेहमिलन कार्यक्रम घेण्यात आला. महासैनिक दरबार हॉलमध्ये मंगळवारी झालेल्या या मेळाव्याला आजी-माजी लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून, फराळाचा आस्वाद घेतला.खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीने दीपावली सणाचे औचित्य साधून, फराळ स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी महासैनिक दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. खासदार धनंजय महाडिक, सौ. अरूंधती महाडिक, चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, विश्‍वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला श्रीमंत शाहू महाराज यांनी उपस्थिती लावून महाडिक परिवाराला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, भरमूआण्णा पाटील, संग्रामसिंह कुपेकर, भगवान काटे, समरजितसिंह घाटगे, राहूल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, डॉ. प्रकाश संघवी, डॉ. अशोक भूपाळी, सुरेशदादा पाटील, भरत पाटील, अरूण इंगवले, सत्यजीत कदम, चंद्रकांत घाटगे, राजसिंह शेळके, विजयसिंह खाडे-पाटील, रशीद बारगीर, रूपाराणी निकम, संगीता खाडे, गायत्री राऊत, रवींद्र मुतगी, नंदकुमार मराठे, हसन देसाई, सुंदर देसाई, विजया पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी मेळाव्याला उपस्थिती लावली. तर सकाळ समुहाचे संचालक संपादक श्रीराम पवार, लोकमतचे मकरंद देशमुख, विठ्ठल पाटील, रितेश पाटील, समीर देशपांडे, सतीश सरीकर, जिल्हा परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी, साखर कारखान्याचे संचालक, सेवा संस्था- दूध संस्था, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून, महाडिक परिवाराला शुभेच्छा दिल्या. माजी आमदार अमल महाडिक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. परस्परांमधील प्रेम- बंधूभाव आणि संवाद वाढीस लागण्यासाठी अशा प्रकारचे स्नेहमेळावे गरजेचे असल्याचे मत, विविध मान्यवरांनी व्यक्त केले. एकमेकांशी गप्पा मारत आणि स्वादिष्ट फराळाचा आस्वाद घेत, हा सोहळा चांगलाच रंगला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!