जायन्ट्स समूहाच्या माध्यमातून आमचे समाजाचे सेवक म्हणून काम : विश्वाध्यक्षा शायना एन.सी

 

कोल्हापूर /प्रतिनिधी : समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या तत्वावर सतत काम करणाऱ्या जायन्ट्स
समूहाच्यावतीने जायन्ट्स समूहाच्या विश्वाध्यक्षा आणि भाजपच्या प्रवक्त्या शायना एन.सी यांनी आज कोल्हापूर येथील जायन्ट्स ग्रुपना भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या जायन्ट्स समूहाच्यावतीने आम्ही समाजातील उपेक्षितांसाठी काम करत आलेलो आहे. 1999 साली मी कोल्हापुरात आले होते. त्यानंतर आता कोल्हापुरात बरीच प्रगती झालेली आहे. जायन्ट्सने देखील आपल्या कार्य कक्षा वाढवलेल्या आहेत. वंचित मुलांसाठी चालवलेल्या बालवाडीला आज त्यांनी भेट दिली. तसेच कोल्हापुरात चालत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली. भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. तसेच महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये जातात हे सर्व उद्योगपतींनी ठरवायचे असते याला सत्ताधारी लोक जबाबदार नाहीत असेही त्या म्हणाल्या. यावेळी जायन्ट्सचे प्रमुख गिरीश चितळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह जायन्ट्सचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!