
सोनी सबवरील मालिका ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से’ सामान्य मध्यमवर्गीय भारतीयाच्या दैनंदिन समस्यांना सुरेखरित्या सादर करते. या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिका ५०० एपिसोड्सचा टप्पा पूर्ण करत असताना कलाकार व टीमने महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत सामान्य व्यक्तींचे नेते व प्रतिनिधी म्हणून मालिकेच्या यशाबाबत सांगितले. हा टप्पा साजरा करण्यासाठी आठवडाभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, जसे पूजा, सेलिब्रेटरी लंच आणि सेटवर केक कापण्याचा समारोह. टीमने महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची मुंबईतील मलबार हिल येथे त्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा वंगल्यावर भेट घेत मोठ्या उत्साहात साजरीकरण केले.महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “माझे वागळे शब्दाशी सखोल नाते आहे, कारण ठाण्यातील वागळे इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या प्रवासाची सुरूवात झाली होती. मालिका ‘वागले की दुनिया’ सामान्य माणसाच्या दैनंदिन संघर्षांना दाखवते. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी सामान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याप्रती वचनबद्ध आहे. मालिका ‘वागले की दुनिया’ने सामान्य माणसाच्या जीवनाला सादर करत आणि अनेक सामाजिक समस्यांशी संबंधित उपाय दाखवत अद्भुत कामगिरी केली आहे. मला आनंद होत आहे की, चॅनेल व निर्मात्यांनी असे उपक्रम हाती घेतले आहेत. दैनंदिन मालिका मनोरंजन करण्यासोबत उत्तम नैतिक संदेश देखील देत आहेत, ज्याचा प्रेक्षकांच्या मानसिकतेवर लक्षणीय परिणाम होत आहे, परिणामी उत्तम समाज निर्माण होण्यास मदत होईल, म्हणूनच मी देखील माझ्या जनतेप्रती वचनबद्ध आहे. मी यशस्वीरित्या ५०० एपिसोड्स पूर्ण करण्यासाठी या मालिकेच्या टीमचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो.’’
आपला आनंद व्यक्त करत सोनी सबचे व्यवसाय प्रमुख नीरज व्यास म्हणाले, “आमच्यासाठी हा अत्यंत लक्षणीय क्षण आहे. आम्ही मालिकेला पाठिंबा दिलेल्या प्रेक्षकांचे आभार मानतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी दिलेल्या मान्यतेमुळे या बाबीला दुजोरा मिळाला आहे. माझ्या मते ‘वागले की दुनिया’च्या संपूर्ण टीमचे प्रयत्न वाखणण्याजोगे आहेत. आम्ही या मालिकेमधून सामान्य व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील समस्यांना वास्तविक रूपात सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.’’सुमीत राघवन ऊर्फ राजेश वागले म्हणाले, ‘’५०० एपिसोड्सचा टप्पा पूर्ण करणे हे आमच्या टीमसाठी मोठे यश आहे आणि मी यासारख्या मालिकेची निर्मिती करण्यासाठी सोनी सब टीम व जेडी मजेठिया यांचे आभार मानतो. कलाकार म्हणून पडद्यामागे देखील नाते उत्तम असणे गरजेचे असते आणि मी असे सर्वोत्तम सह-कलाकार सोबत असल्याने स्वत:ला धन्य मानतो. मी दररोज त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असतो. आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रींना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करण्याची सुवर्णसंधी मिळाली. तो अत्यंत अद्भुत अनुभव होता.’’
Leave a Reply