
कोल्हापूर : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीभोवती वनखात्याच्या हद्दीत काही अतिक्रमणं केली जात होती. दर्गा बांधला जात होता. अफजलखानाचं दैवतीकरण केलं जात असल्याचा आरोप १९९० सालीच केला होता. तेव्हापासून हा वाद सुरू होता. याप्रकरणी कोर्टाने २०१७ साली निर्णय देत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर अद्याप कारवाई झाली नव्हती. परंतु, आजच्या शिवप्रताप दिनी शिंदे सरकारने “सर्जिकल स्ट्राईक” सारखी भूमिका घेत अफजल खानाच्या उद्दात्तीकरणाचा डाव मोडून काढला आणि खानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढून टाकले. हा या हिंदुत्ववादी सरकारचा मास्टर स्ट्रोक असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी सांगितले. अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण काढल्याने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेच्यावतीने आनंदोत्सव साजरा करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर – पेढे वाटप केले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना- भाजप युती शासनाचा विजय असो, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी महानगरसमन्वयक श्रीमती पूजा भोर, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, शिवसेना उपशहरप्रमुख अमित चव्हाण, सुनील खोत, अश्विन शेळके, मंदार तपकिरे, योगेश चौगले, कपिल सरनाईक, निलेश गायकवाड, कपिल केसरकर, अंकुश निपाणीकर, सम्राट यादव, कपिल नाळे, सुरेश माने, अंकुश निपाणीकर, टिंकू देशपांडे, युवा सेना शहर अधिकारी पियुष चव्हाण, रिक्षा सेना जिल्हाप्रमुख रमेश पोवार, शहरप्रमुख अल्लाउद्दिन नाकाडे, रणजीत सासणे आदी शिवसेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply