
कोल्हापूर: थेट पाइप लाईन, पाणी पुरवठा, रस्ते पॅचवर्क, आय टी पार्क, अमृत योजना, मोकाट कुत्री, कचरा उठाव, स्मशानभूमी अशा विविध विषयावर आज माजी मंत्री व आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, महापालिकेचे विविध विभागाचे अधिकारी तसेच महापालिकेचे माजी नगरसेवक यांच्या उपस्थित आढावा बैठक घेतली.शहरात सुरू असलेली तसेच प्रस्तावित विविध विकासकामे योग्य नियोजन करून, वेळत पूर्ण करा अशा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या.युवा उद्योजक व गोशीमाचे संचालक सत्यजित चंद्रकांत जाधव, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त विनायक आऊंधकर, नगररचनाकार रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, लेखपरीक्षक मिलिंद कुलकर्णी, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, राजू लाटकर, शारंगधर देशमुख, विनायक फाळके, जय पटकारे, सचिन पाटील, राहुल माने, आदिल फरास, मोहन सालपे आदी उपस्थित होते.
Leave a Reply