
कोल्हापूर: कोल्हापूरमधील पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि भविष्याच्या दृष्टीने विचार करून नवीन अद्ययावत असे संभाजीनगर बस स्थानकाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या बस स्थानकात सुरू असलेल्या कामाची पाहणी आज आमदार सतेज पाटील यांनी केली. यावेळी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला आणि त्यांना पुढील कामकाजासंदर्भात सूचना दिल्या.
संभाजीनगर बस स्थानकासाठी 9 कोटी 80 लाख रुपये खर्चून अद्ययावत बस स्थानक उभारण्यात येत आहे. संभाजीनगर बस स्थानकाच्या आवारात महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे कोल्हापूर विभागीय कार्यालय असणार आहे. तसेच 11 नवीन प्लॅटफॉर्म, कँटीन, हिरकणी कक्ष, पार्सल विभाग, स्त्री-पुरुष विश्रांती गृह, स्वच्छता गृह, मेडिकल दुकाने, खाद्य पदार्थ दुकाने आणि इतर साहित्याची दुकाने उभारण्यात येणार आहेत.
यावेळी,आमदार ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, मधुकर रामाने, आदिल फरास,सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, देवेंद्र सरनाईक, अशोक वाली, दत्ता बामणे, एस आर जाधव, यासीन पैलवान, किरण भोसले, परिवहन अभियंता मनोज लिंग्रज, यंत्र अभियंता यशवंत कांनतोडे, विभागीय अधिकारी शिवराज जाधव, सुधीर भातमारे, आगार व्यवस्थापक उत्तम पाटील,बस स्थानक प्रमुख सागर पाटील, संदीप दड्डी, हर्षवर्धन तायवाडे, एस एन पोवार,यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply