पॅनासोनिककडून भारतीयांसाठी लक्‍झरी किचन सोल्‍यूशन देणारे आय-क्‍लास मॉड्युलर किचन लॉन्‍च

 

पॅनासोनिक लाइफ सोल्‍यूशन्‍स इंडिया या इलेक्ट्रिकल बांधकाम साहित्‍य, हाऊसिंग व वैविध्‍यपूर्ण इलेक्‍ट्रॉनिक्‍स तंत्रज्ञानांच्‍या सर्वात मोठ्या देशांतर्गत उत्‍पादक कंपनीने त्‍यांच्‍या विशेष आय-क्‍लास मॉड्युलर किचन श्रेणीच्‍या लॉन्‍चची घोषणा केली. ही नवीन श्रेणी जपानी तंत्रज्ञान आणि भारतीय उत्पादनाच्या संयोजनाचा वापर करून त्यांचे किचन्‍स सानुकूलित करू पाहणाऱ्या घरमालकांसाठी एक-थांबा शॉप असेल, तसेच परवडणारे लक्झरी पर्याय शोधणाऱ्या वापरकर्त्यांसाठी सानुकूल आकर्षकतेची भर करेल. नवीन श्रेणी भारतातील २३ शहरांमधील२५ रिटेल स्टोअर्समध्‍ये उपलब्ध असेल.या नवीन आय-क्‍लास किचनमध्‍ये भारतभरातूनमिळवलेले दर्जात्‍मक साहित्‍य आणि जपानमधील आधुनिक तंत्रज्ञानाचे संयोजन आहे. यामध्‍ये भारतीय घरांना अधिक जागा देण्‍यासाठी १०० टक्‍के स्‍मार्ट स्‍टोरेज सारखी उच्‍च सानुकूल वैशिष्‍ट्ये आहेत. क्रॉसपीसच्‍या माध्‍यमातून काऊंटरटॉप्‍स वाढवण्‍यात आले आहेत, जे प्रबळ टिकाऊपणा व स्थिरता देतात. प्‍लायवूडपासून बनवण्‍यात आलेले संपूर्ण कॅबिनेट स्‍मार्ट व कार्यक्षम वैशिष्‍ट्यांसह येतात, जसे एसएस मॅट व रबर स्ट्रिप्‍स, जे सॉफ्ट डाऊन टेक्‍नोलॉजी व अद्वितीय स्‍टोरेज शिफ्टिंग टेक्‍नोलॉजीज देतात, त्‍यामधून संपूर्ण किचनच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर होते. आय-क्‍लास श्रेणी ग्राहकांना कॅबिनेट दरवाज्‍यांना विविध साहित्‍य व फिनिशमधील शेकडो रंग व पॅटर्न्‍समध्‍ये सानुकूल करण्‍याची सुविधा देते. पॅनासोनिक लाइफ सोल्‍यूशन्‍स इंडिया नवीन श्रेणीवर १०-वर्ष रिप्‍लेसमेंट गॅरंटी देखील देते. म्‍हणून नवोन्‍मेष्‍कारी तंत्रज्ञान सोल्‍यूशन्‍स व आकर्षक स्ट्रिमलाइन डिझाइन्‍सने युक्‍त आय-क्‍लास मॉड्युलर किचन श्रेणी पॅनासोनिक विश्‍वास व ब्रॅण्‍ड तत्त्वांना सार्थ ठरवते.भारताला प्राधान्य देणारी बाजारपेठ असल्याने पॅनासोनिकचे भारतीय ग्राहकांसाठी ५० दिवसांच्या डिलिव्हरी आणि इंस्टॉलेशन्ससह देशभरात नवीन आय-क्लास किचन श्रेणी सुरू करून मॉड्युलर किचन व्यवसायात जलद विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे.पॅनासोनिक हाऊसिंग सोल्‍यूशन्‍स कं. लि.च्‍या किचन फर्निचर, बाथरूम अॅण्‍ड सॅनिटरी फिटिंग्‍ज बिझनेस डिव्हिजनचे सहाय्यक संचालक श्री. योशीयुकी किताझाकी म्‍हणाले, “आमचा विश्वास आहे की, भारतीय बाजारपेठ आमच्या परदेशी व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाचा प्रदेश आहे. आणि या महिन्यातआम्ही भारतात बनवलेले एक नवीन उत्पादन, ‘आय-क्लास किचन’ रिलीज करत आहोत. नवीन उत्पादन आय-क्लास किचनच्या समावेशासहआम्ही आमच्या भारतीय व्यवसायाचा आणखी विस्तार करण्यासाठी आणि आमच्या निवासी उपकरणांच्या व्यवसायासाठी एक ब्रॅण्‍ड स्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या विपणन कृतींना अधिक प्रबळ करू. अधिक पुढे जात आमची कंपनी आरामदायी लिव्हिंग स्‍पेसेसची सुविधा देत अधिक आरामदायी आणि सुरक्षित समाज स्‍थापित करण्‍याच्‍या दिशेने योगदान देईल.”पॅनासोनिक लाइफ सोल्‍यूशन्‍स इंडियाचे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक दिनेश अग्रवाल म्‍हणाले, “आर्थिक वाढीसह भारतीय वापरकर्त्यांच्या अपेक्षा, डिझाइन आणि किचनमधील जागांची उपयुक्तता यामध्ये बदल दिसून येत आहे. २०१८ मध्ये लॉन्‍च करण्‍यात आलेल्‍या आलिशान पॅनासोनिक एल-क्लास किचन्‍सना भारतात खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतरपॅनासोनिक आय-क्‍लास किचन्‍स श्रेणी सादर केली जात आहे, ज्यामध्ये एल-क्‍लासची कार्यक्षमताआणि भारतीय बाजारपेठेतील नागरी बांधकामातील आव्हाने, आपल्या देशातील विविध प्रदेशांमधील स्वयंपाकघरातील विशिष्ट स्टोरेज गरजा व एर्गोनॉमिक्स यांविषयीचीसखोल माहिती यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!