
जिल्हाअधिकारी यांना युवा पत्रकार संघाचे निवेदन
युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून पुढील राज्य हिवाळी अधिवेशनामध्ये पत्रकारांच्या हिताचे मागण्याचे निवेदन सांगली जिल्हाअधिकारी यांना शिष्टमंडळातर्फे देण्यात आले.पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन हिवाळी अधिवेशनामध्ये पाठवून सहकार्य व सकारात्मक विचार व्हावा असे निवेदनात म्हटले आहे.
1] केंद्र आणि राज्य पातळीवर माध्यम पत्रकार भवन स्थापन करण्यात याव्यात. ते महाराष्ट्र सदन दर्जाचे असावे,
2] केंद्र व राज्य स्तरावर पत्रकार माध्यम कल्याण मंडळाची स्थापना करावी.
3] तहसील ते जिल्हास्तरापर्यंत मीडिया सेंटरची इमारत बांधण्यात यावी.4] सर्व राज्यांमध्ये पत्रकार संरक्षण कायदयाची अमलबजावणी करावी.5] पत्रकार कुटुंबीयांना व पत्रकार बांधवांना पत्रकार सुरक्षा भत्ता म्हणून दरमहा मानधन देण्यात यावे.6] समान संधी, समान हक्क, समान दंडसंहिता, समान शिक्षण संहिता, एकसमान पोलीस संहिता, एकसमान आरोग्य संहिता, एकसमान न्यायिक संहिता, समान नागरी संहिता, एकसमान प्रशासन संहिता यावर ठोस कायदे केले पाहिजेत.7] पत्रकारांच्या छळाची व हल्ल्याची नोंद करण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर पत्रकार श्रवण पोर्टल आणि हेल्पलाइन क्रमांक सेवा सुरू करावी.8] प्रसारमाध्यमांशी संबंधित प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायालय स्तरावर स्वतंत्र जलदगती न्यायालये निर्माण करावीत.9] पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या अपघाती मृत्यूवर सरकारने किमान 25,0000 रुपये (25 लाख) मदत देण्याची, तसेच पत्रकारावर अवलंबून असलेल्यांना सरकारी नोकरी देण्याची तरतूद लागू करावी.10] महिला पत्रकारांचा सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबन लक्षात घेऊन महिला पत्रकार वसतिगृहे बांधली जावीत.11] 18 ते 60 वर्षे वयापर्यंतचे पत्रकार आणि प्रसार माध्यमातील कर्मचारी यांना रोडवेज बस, ट्रेन, विमान या प्रवासादरम्यान तिकिटाच्या दरात 50% सवलत देण्यात यावी व टोल टॅक्स मोफत प्रवास पत्रकारांना जारी करण्यात यावे.12] देशातील सर्व अपरिचित पत्रकारांच्या नावांची यादी करून त्यांना तत्सम अधिकारी मार्फत मान्यता प्रमाणपत्र/ ओळखत पत्र देण्यात यावे आणि त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आयुष्मान भारत योजनेशी जोडण्यात यावे.13] सर्व पत्रकार आणि माध्यम कर्मेयांना व्ही आय पी दर्जा देण्यात यावा.14] विधान परिषद पत्रकार मतदारसंघ गठीत करण्यात यावा व विधानपरिषदेच्या विहित जागांमध्ये पत्रकार आमदाराचा कोटा निश्चित करण्यात यावा व पत्रकार आमदाराची निवड ही तंतोतंत विधानपरिषदेचे शिक्षक व पदवीधर आमदार या नियमानुसारच करण्यात यावी.मतदार अनुभवी पत्रकारांची यादी तयार करून पत्रकार आमदाराची निवडणूक घेण्यात यावी.15] राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन नवोदित पत्रकारांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारावीत.मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात असे जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळातर्फे विनंती करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे,कौतुक नागवेकर,प्रविण मिरजकर, मीनाज तांबोळ,संग्राम मोरे,इरफान बारगीर,निलेश मगर उपस्थित होते.
Leave a Reply