महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम

 

कोल्हापूर : स्वच्छ भारत अभियानाचे धर्तीवर राज्यामध्ये राबविणेत येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासन परीपत्रकान्वये राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी त्यांचे कार्यक्षेत्रामध्ये  संकल्पना आधारीत स्वच्छता मोहीम राबविणेबाबत सुचना निर्गमित करणेत आल्या आहेत. तद्अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, अधिकारी तथा त्यांचे अधिनस्त कार्यरत कर्मचारी  यांचे सहभागाने सकाळी 8 ते 10 या वेळेत शहरातील स्वामी समर्थ मंदीर, कोटीतीर्थ तलाव, टेंबलाई मंदीर रावणे­ार मंदीर शाहु स्टेडीयमजवळ दत्त मंदीर, फुलेवाडी या ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविणेत आली आहे. सदर मोहीमेअंतर्गत जवळपास 20 मेट्रीक टन कचरा उठाव करणेत आला आहे. तसेच स्वामी समर्थ मंदीर येथील कोटीतीर्थ तलावातील 2 डंपर इतका गाळ जे.सी.बी. मशिनच्या सहाय्याने  काढणेत आला आहे. सदरची स्वच्छता मोहीम कोल्हापूर महानगरपालिकेचे उप-आयुक्त (2) ज्ञानेश्वर ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली राबविणेत आली असून या मोहीमेत महापालिके कडील उप-शहर अभियंता, मुख्य आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व सार्वजनिक बांधकाम तसेच आरोग्य विभागाकडील एकुण 200 कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!