महालक्ष्मी मंदिर परिसरातील विना परवाना व्यवसायांची तपासणी

 

कोल्हापूर:  महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर व अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांनी आज अचानक महालक्ष्मी मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकाम/पार्कीग व्यवस्था, अग्निशमक यंत्रणा व विना परवाना व्यवसायांची तपासणी केली. 
 या तपासणी मध्ये फॅशन इनस्टा-रेडीमेड कपडे विक्री (प्रोप्रा. प्रशांत बाबुराव तोरस्कर), शमीम अन्सारी -टेलरिंग ,बालाजी भवन महाद्वाररोड या विनापरवाना व्यवसाय सिलबंद करणेचे आदेश  देण्यात आले.   त्याप्रमाणे परवाना विभागाकडून तात्काळ  या व्यवसायईकांचे विनापरवाना व्यवसाय सिलबंद करण्यात आले आहेत.  तसेच याच परिसरातील रुपल लेडीज वेअर, भास्कर बुरानी, अंजूम कुरणे, साजन सलोजा , आदिल ज्वेलर्स या व्यवसाईकाचे व्यवसाय तात्काळ परवाना नसल्याने बंद करण्यात आले आहेत. 
बालाजी भवन,माऊली लॉज,शाम सुंदर हॉटेल, तुळजाभवानी संकुल, राजाबाळ लॉज या ठिकाणचे मंजूर बांधकाम  परवानगीची व प्रत्यक्ष झालेल्या बांधकामाची तपासणी  करुन अतिरिक्त अनधिकृत बांधकाम जेथे जेथे आढळून आले त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. विशेषत: पार्कीग बाबतची तपासणी करण्यात आली. मंजूर प्लॅन प्रमाणे पार्कीग नसलेल्या मिळकतीवर सत्वर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच पाणी पुरवठा, घरफाळा आकारणी व अग्निशामन यंत्रणेबाबतची तपासणी करण्यात आली.   
या वेळी सहाय्यक संचालक नगररचना धनंजय खोत, उपशहर अभियंता एस.के.पाटील, कनिष्ठ अभियंता ए.ए. गुजर, अनिल गवळी, वेल्हाळ, अग्निशमन विभागाचे स्टेशन ऑफिसर, तानाजी कवाळे, परवाना विभागाचे  भगवान मांजरे ,अनिल आदिलवाल, अमर यादव,गणेश गौरकर, पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता व्यंकटराव सुरवसे, आदी उपस्थित होते.  ही मोहिम अशीच सुरु राहणार असून व्यवसायकांनी आवश्यक असलेले महानगरपालिकेचे परवाने नियमित करुन घ्यावेत. 
तसेच मंजूर नकाशा प्रमाणे पार्कीग व्यवस्था/अग्निशमन सुविधा तात्काळ ठेवणेत यावी असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!