नकळत सारे घडले’ मध्ये बदलणार नेहाचा लुक

 

स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतली नेहा, अर्थातनुपूर परूळेकर आता नव्या लुकमध्ये दिसणार आहे. डॉक्टरअसलेली नेहा पुन्हा प्रॅक्टिस करताना दिसणार असून,साडीऐवजी पंजाबी ड्रेस वापरायचं तिनं ठरवलं आहे.

छोट्या परीला वेळ देण्यासाठी नेहानं आपली मेडिकलचीप्रॅक्टिस सोडली होती. आता पुन्हा प्रॅक्टिस करावी, स्वत:चंक्लिनिक सुरू करावं, असं प्रताप नेहाला सुचवतो. प्रॅक्टिस सुरूकरताना साडीऐवजी छान पंजाबी ड्रेस घालत जा, असं छोटीपरी नेहाला सांगते. प्रताप आणि परीच्या आयडियालाघरच्यांकडूनही पाठिंबा मिळतो. त्यामुळे नेहा  उत्साहानं, नव्यालुकमध्ये पुन्हा प्रॅक्टिस सुरू करण्याचा निर्णय घेते. लग्नानंतरप्रॅक्टिसपासून दूर गेलेली, परीच्या संगोपनात रमलेली डॉ. नेहापुन्हा क्लिनिकमध्ये येणार आहे. नेहाचा हा निर्णय तिच्यासाठीनवी सुरूवात ठरेल का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

नेहाची भूमिका साकारणारी नुपूर परूळेकर नव्या लुकविषयीम्हणाली, “नवा लुक मिळणं ही माझ्यासाठी नक्कीच आनंदाचीगोष्ट आहे. मला हा लुक आवडला. कॅरी करायला सोपा असा हालुक आहे. या लुकमुळे परीची इच्छाही पूर्ण झाली. बदललेल्यालुकबरोबरच नेहा ही व्यक्तिरेखाही वेगळ्या पद्धतीनं साकारतायेणार आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार, नेहाचा प्रवासकसा असेल या विषयी माझ्याही मनात कुतूहल आहे.”

आता पुन्हा प्रॅक्टिसकडे वळलेल्या डॉ. नेहाच्या आयुष्यात पुढेकाय घडणार हे जाणून घेण्यासाठी न चुकता पहा ‘नकळत सारेघडले’ सोमवार ते शनिवार सायं. ७.३० वाजता फक्त स्टारप्रवाहवर!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!