
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून गेल्या अनेक महिन्यांपासून वाहन पासिंगच्या नावाखाली वाहनधारकांकडून दंड वसूल केला जात आहे.एप्रिल २०१४ पासून पासिंग न झालेल्या वाहनासाठी जागेवर २ हजार रुपये दंड तसेच एप्रिल २०१४ पासून आजतागायत जितके दिवस झाले आहेत तितक्या प्रत्येक दिवसाला ५० रुपये प्रमाणे दंड अशी अन्यायी वसुली आरटीओ कडून होत आहे.टेम्पो.ट्रक या तसेच सर्व वाहनधारकांना हा नाहक बुर्दंड बसत आहे. ५० रुपये प्रती दिवस ही दंड वसुली त्वरित थांबवावी अशी मागणी आज बजरंग दलच्या वतीने करण्यात आली.
पुणे तसेच इतरत्र पासिंग न झालेल्या वाहनांना दंड आहे.पण प्रती दिवस ५० रुपये हा दंड आकारला जात नाही मग वाहतूक नियम कायदा संपूर्ण महाराष्ट्रात सारखा असताना हा अन्यायी दंड फक्त कोल्हापुरातच का? कोल्हापूर महसूल देण्यात अव्वल जिल्हा असतानाही जाचक अटी लागू करून वाहनधारकांना लुटण्यामागे या अधिकाऱ्यांचा काय उद्देश आहे.त्याचप्रमाणे अधिकारी महिनाभर रजेवर जातात,त्या रजेची नोंद नसते,आर.टी ओ मध्ये कामासाठी आलेल्या लोकांची गैरसोय होते,अधिकारी अरेरावीची भाषा वापरतात,कामात दिरंगाई होते.या सर्व बाबी तसेच ५० रुपये प्रती दिवस हा दंड घेतला जाऊ नये यासाठी मागील महिन्यात आर.टी.ओ ,जिल्हाधिकारी तसेच प्रादेशिक परिवहन मंत्री यांना निवेदन देण्यात आले होते.तसेच यापुढेही प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांची समक्ष भेट घेऊन ही अन्यायकारी दंड वसुली पुराव्यानिशी त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत अशी माहिती बजरंग दलाचे शहरप्रमुख महेश उरसाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे,माजी नगरसेवक प्रकाश भोसले,प्रशांत कागले,रमेश ठोंबरे,राजेंद्र सूर्यवंशी,सागर कलघटगी कुणाल शिंदे उपस्थित होते.
Leave a Reply