
असळज/गगनबावडा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. 21 ग्रामपंचायतीपैकी तब्बल 18 ठिकाणी आमदार सतेज पाटील गटाचे सरपंच विजयी झाले असून एका ग्रामपंचायत मध्ये काँगेससह स्थानिक आघाडीने विजय मिळवला आहे. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके गटाचे 2 सरपंच विजयी झाले.गगनबावडा येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीत मतमोजणीस प्रारंभ झाला. एकूण नऊ टेबलवर सहा टप्यात तहसिलदार डॉ.संगमेश काडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी करण्यात आली. सकाळी 10 च्या सुमारास साळवण ग्रामपंचायतीचा निकाल पहिल्यांदा जाहीर करण्यात आला.
तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या बावेली, कडवे, तळये बुद्रुक या ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. साखरी-म्हाळुंगे, तिसंगी, साळवण, मांडुकली, शेणवडे, खोकुर्ले, असळज, धुंदवडे, खेरीवडे, गारीवडे-बोरबेट व मार्गेवाडी या 11 ठिकाणी सत्ता कायम राहिली आहे. निवडे, वेसर्डे, कोदे बुद्रुक, मणदूर, अणदूर, शेळोशी व जर्गी या 7 ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली आहे.
तालुक्यातील साखरी म्हाळुंगे, निवडे, साळवण, तळये बुद्रुक, कोदे बुद्रुक, मणदूर, मांडुकली, अणदूर, शेणवडे, खोकुर्ले, असळज, धुंदवडे, खेरीवडे, शेळोशी, जर्गी, बावेली, कडवे व मार्गेवाडी या 18 ठिकाणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील गटाने सरपंचपद मिळवले आहे. वेसर्डे व बोरबेट-गारीवडे या 2 ग्रामपंचायतीत शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके गटाने सरपंचपद मिळवले आहे. तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या तिसंगी ग्रामपंचायतीत मात्र काँग्रेससह स्थानिक आघाडीचा सरपंच झाला आहे. निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. गगनबावडा पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ग्रामपंचायतनिहाय विजेते सरपंच पुढीलप्रमाणे : मांडुकली – राजाराम तुकाराम पाटील (काँग्रेस), खोकुर्ले – सुनिता भीमराव कांबळे (काँग्रेस), तळये बुद्रुक – केरबा दादू पाटील (काँग्रेस), साखरी-म्हाळुंगे –किरण यशवंत कांबळे (काँग्रेस), खेरीवडे – शारदा सागर पाटील (काँग्रेस), कडवे – रेश्मा अंकुश परीट (काँग्रेस), बावेली – युवराज पांडूरंग कदम (काँग्रेस), तिसंगी –सर्जेराव ज्ञानू पाटील (काँग्रेससह स्थानिक आघाडी), जर्गी – सुलाबाई बाळू आंबुस्कर (काँग्रेस), शेळोशी – भारती प्रकाश कांबळे (काँग्रेस), बोरबेट –संतोष नानू पाटील (शिवसेना), धुंदवडे – मारुती गुंडू पाटील (काँग्रेस), मणदूर – नामदेव बापू कांबळे (काँग्रेस), साळवण – योगेश दत्तात्रय काटकर (काँग्रेस), निवडे – सरिता दिपक पाटील (काँग्रेस). बिनविरोध निवड झालेले सरपंच पुढीलप्रमाणे : मार्गेवाडी – परशराम विलास खानविलकर (काँग्रेस), अणदूर – सरिता पांडुरंग पाटील (काँग्रेस), कोदे बुद्रुक – शोभा विलास पाटील (काँग्रेस), वेसर्डे – संतोष सदाशीव गुरव (शिवसेना), असळज – वैशाली संदीप गावकर (काँग्रेस), शेणवडे- उज्वला दादू पाटील (काँग्रेस). विजयानंतर गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
Leave a Reply