
कोल्हापूर/प्रतिनिधी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५७ वे अधिवेशन कोल्हापुरामध्ये संपन्न झाले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी परिषदेची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या कार्यकारणीमध्ये प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते, प्रदेश मंत्री ऍड. अनिल ठोंबरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तात्यासाहेब घावटे, प्रा. डॉ. शरद गोस्वामी, प्रा. शिल्पा जोशी, प्रदेश सहमंत्री अमोघ कुलकर्णी, रोहित राऊत, गौरी पवार, आनंद भुसनर, शुभांगी निकम, प्रदेश संघटन मंत्री अभिजीत पाटील, प्रदेश कार्यालय मंत्री कौस्तुभ पिले, प्रदेश प्रमुख अंबर देव, पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी, पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय सह संघटन मंत्री राय सिंह यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. तसेच अधिवेशनामध्ये शिक्षण, समाज आणि G20 संबंधित सामाजिक सद्यस्थिती, शिक्षण क्षेत्रात व्हावे विद्यार्थी हिताचे निर्णय आणि वैश्विक पटलावर भारताची महत्त्वपूर्ण भूमिका असे तीन प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले. येत्या महिन्यात अभावीप युवक सप्ताहनिमित्त कार्यक्रमांचे विशेष नियोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर सत्रे आयोजित करण्यात येतील. तसेच अभाविपच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या या वर्षात अनेक उपक्रम राबवले जाणार असल्याचे अभाविप अधिवेशन स्वागत समिती सचिव प्रसन्न म्हाकवेकर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री ऍड.अनिल ठोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Leave a Reply