हिंदूसंघटन आणि ‘हिंदु राष्ट्रा’साठी १२ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा 

 

कोल्हापूर :हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’, भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी पद्मराजे गर्ल्स हायस्कूल, खरी कॉर्नर, कोल्हापूर येथे सायंकाळी सहा वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक  किरण दुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी शिवसेना करवीरतालुकाप्रमुख राजू यादव, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते. या सभेसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, भाजप कोल्हापूर जिल्हाउपाध्यक्ष श्री. सचिन तोडकर यांनी पाठिंबा घोषित केला आहे.

किरण दुसे म्हणाले, ‘‘या सभेत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे  अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत. हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्ह्यातही व्यापक कार्य चालू असून हिंदू संघटन मेळावे, ‘हलाल’सक्तीच्या विरोधात जागृती यांसह राष्ट्र आणि धर्म यांवर आघात करणार्‍या विविध विषयांवर निवेदन, आंदोलन, पत्रकार परिषद, धर्मशिक्षणवर्ग या माध्यमातून जनजागृती चालू आहे.
या सभेच्या प्रचारासाठी १० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता वाहनफेरी काढण्यात येणार आहे. ही वाहनफेरी मिरजकर तिकटी येथून प्रारंभ होईल. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल – टिंबर मार्केट कमान – उभा मारुति चौक – तटाकडील तालीम – निवृत्ती चौक – बिनखांबी गणेश मंदिर – महाद्वार रोड – छत्रपती शिवाजी महाराज चौक – भवानी मंडप – बिंदू चौकमार्गे मिरजकर तिकटी येथे फेरीची सांगता होईल. तरी या फेरीसाठी आणि १२ फेब्रुवारीला होणार्‍या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन किरण दुसे यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!