
कोल्हापूर: जुनी पेन्शन पुन्हा लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. ९०हून अधिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोर्चात सहभागी झाले होते.गांधी मैदानातून सुरु झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कोल्हापूर येथे पोहोचल्यानंतर तेथे उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले होते.जुनी पेन्शन हा मागील १०-१२ वर्षांपासून चर्चेत असणारा विषय आहे. यापूर्वी जेव्हा जुन्या पेन्शनचा विषय चर्चेला यायचा तेव्हा आर्थिक सबब सांगून हा विषय टाळला जायचा. या योजनेविषयी आमच्याही मनात काही शंका होत्या. मागील काही वर्षात कर्मचारी संघटनांनी याविषयी अभ्यासपूर्ण माहिती सर्वांसमोर मांडली असे यावेळी माजी गृह राज्यमंत्री यांनी सांगितले.महागाई दर ६ टक्के असताना नव्या पेंशनप्रमाणे केवळ २ टक्के परतावा मिळतो हे कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केले आहे. गेल्या १० वर्षात नव्या पेन्शन मधील उणिवांमुळे कर्मचाऱ्यांनी त्रास भोगला आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीला महाविकास आघाडीचा पाठिंबा असून चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न महाविकास आघाडीच्या वतीने मांडण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले.
काँग्रेसशासित ४ राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय उत्पन्नात सर्वाधिक वाटा असणाऱ्या महाराष्ट्रानेही जुनी पेन्शन लागू करावी अशी आमची मागणी आहे. छत्रपती शाहू महाराजांनी ज्या भूमीतून समतेचा संदेश दिला त्या भूमीतून जुन्या पेन्शनचा लढा आपण उभारत आहोत याचा अभिमान आहे असे नमूद केले.”एकच मिशन, जुनी पेन्शन”,अशा घोषणा देत भव्य मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी दिले.या मोर्चात आमदार अरुण अण्णा लाड, आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे तसेच सचिन चव्हाण, आर.के. पोवार, विजय देवणे, सुनील मोदी, दादासाहेब लाड, एस.डी.लाड, बाबा पाटील, समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर, कॉम्रेड दिलीप पवार, खंडेराव जगदाळे, भरत रसाळे, सुरेश संकपाळ, सतीश बरगे, गौतम बर्धन यांच्यासह ९० संघटनांचे पदाधिकारी, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply