
कोल्हापूर: शिवशंकराचा जयघोष, अभिषेक, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, पालखीत शिवलिंगाची स्थापना, रांगोळी अन् फुलांच्या पायघड्या, धनगरी ढोल, झांजपथक, आतषबाजी आणि भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापनदिन सोहळा साजरा झाला.मंगळवारपेठेतील कैलासगडची स्वारी मंदिराच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, भजन व सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, शाहिर कार्यक्रमास मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.मंगळवारी मुख्य पालखी सोहळा होता. सायंकाळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचे पूजन झाले. यावेळी अध्यक्ष बबेराव जाधव, उपाध्यक्ष सत्यजित चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक संभाजी जाधव, वाघापूरचे श्री संत बाळूमामाचचे भाकणूककार कृष्णात डोने महाराज, शिवाजी जाधव, विलास गौड, गणेश भोसले, विठ्ठलराव जाधव, विजयराव देवणे, माजी नगरसेवक आर डी पाटील, अशोक मेस्त्री, गणेश भोसले, महेश जाधव सर्व विश्वस्त आदी मान्यवर उपस्थित होते.तत्पूर्वी पहाटे श्रींस अभिषेक व आरती करण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिरापासून पालखी सोहळ््याला सुरुवात झाली. पालखीच्या सुरुवातीला धनगरी ढोल पथकाचे तालबद्ध वादन आणि नृत्य, शिवालय भजनी मंडळाचे भजन संपन्न झाले .यानंतर भाविकांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Leave a Reply