
कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २१०२ या वर्षात झालेल्या ऊस आंदोलनात दोन शेतकरी शहीद झाले. या शेतकऱ्यांचा कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख रुपये मदत केली जाईल अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी जाहीरपणे केली होती.यासाठी मदत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निधी जमा केला गेला. पण प्रत्यक्षात मात्र या कुटुंबापर्यंत हा निधी पोहचलाच नाही असा गंभीर आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ता संजय पाटील-घाटणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.जमा झालेल्या निधीचा हिशोब द्यावा आणि त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तो निधी पोहोचावा अन्यथा खासदार राजू शेट्टी तसेच सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
Leave a Reply