
कोल्हापूर: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या संकल्प सत्याग्रह कार्यक्रमान्वये आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये DEMOCRACY DISQUALIFIED शिर्षकांतर्गत मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करण्यासाठी माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत असगावकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड.गुलाबराव घोरपडे, सरलाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पत्रकार परिषद घेण्यात आली.मोदी-अदानी या भ्रष्ट युतीने देशाच्या लोकशाही व संविधानावर घाला घातला असून सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून चालू असलेल्या हुकूमशाही कारभारावर देखील प्रश्न विचारण्यात आले.सदर पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply