
कोल्हापूर : शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची मोर्चेबांधणी यासाठी खासकरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मेळाव्याद्वारे ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. पेटाळा मैदान येथे आयोजित पदाधिकारी व शिवसैनिक मेळावा “न भूतो न भविष्यती” अशा पद्धतीने यशस्वी करू, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष .राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना उपनेते आनंद जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आदींनी सभा स्थळाची पाहणी करत, सुरु असलेल्या जय्यत तयारीचा आढावा घेतला. यासह आवश्यक सूचना संबधितांना दिल्या.उद्या होणारा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक जोमाने कार्यरत असून, मेळावा यशस्वी करून आगामी सर्वच निवडणुकात कोल्हापुरातून शिवसेना हा एक नंबरचा पक्ष होण्यासाठी आम्ही जोमाने काम करत आहे. उद्याच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिकानी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी राहुल चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, जिल्हा युवा संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख पियुष चव्हाण, गणेश रांगणेकर, रणजीत मंडलीक, अंकुश निपाणीकर, रियाज बागवान, ओमकार परमणे, अविनाश कामते, अल्लाउद्दिन नाकाडे, राजू काझी, राजू पुरी, सौरभ कुलकर्णी, विनोद हजारे, सचिन राऊत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply