
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा. संघ (गोकुळ)च्या वतीने संघाच्या सन १९६३ च्या संघ स्थापनेवेळी गोकुळचे शिल्पकार स्व.आनंदराव पाटील (चुयेकर) यांना मोलाचे सहकार्य करून सुरवातीच्या प्रतिकूल परिस्थितीत कष्ट केलेल्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेचा भाव आणि सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये अर्थ सहाय्याचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला, जुने ऋणानुबंध मजबूत करण्यासाठी कृतज्ञता एक प्रभावी साधन आहे. कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेचा भाव जपत गोकुळने केलेली मदत नव्वदीकडे झुकलेल्या त्या सेवानिवृत्तांच्या थरथरत्या हातांना लाखमोलाची ठरेल. असे भावोद्गार गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी यावेळी काढले. गोकुळने लाखमोलाचा आधार दिल्याने वृद्ध कर्मचारी भारावले. गोकुळ आणि कर्मचाऱ्यांतील ऋणानुबंध घट्ट करणाऱ्या या क्षणाने सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
Leave a Reply