
मुंबई: गोकुळचे नवीन प्रतीचे गोकुळ शक्ती दूध हे निश्चित बाजारपेठेमध्ये नाव करेल व वितरक ही विक्रीसाठी सहकार्य करतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, संघामार्फत बाजारात सध्या फुल क्रीम व गाय दुधाची विक्री सांगली, बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच पणजी(गोवा), पुणे व मुंबई, ठाणे जिल्ह्यात केली जात आहे.पणजी(गोवा), पुणे व मुंबई, ठाणे जिल्ह्यात केली जात आहे. सध्या गोकुळची दररोज १४ लाख लिटर पर्यंत दुधाची विक्री केली जात आहे. दुधाबरोबरच गोकुळच्या पनीर, श्रीखंड, तूप, टेबल बटर, फ्लेवर मिल्क इत्यादी दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात बाजारातून मागणी होत असते. गेले काही दिवसापासून दूध घेणाऱ्या ग्राहकांकडून विशेषतः स्पेशल होमोजिनाइज्ड केलेले टोण्ड दुधाची उपलब्धता करून द्यावी अशी विनंती केली जात होती. मुंबई येथील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन गोकुळने दुधावर विशेष प्रक्रिया स्पेशल होमोजिनाइज्ड व बॅक्टोफ्युज केलेली टोण्ड दूध ‘गोकुळ शक्ती’ या नावाने विक्री करणेचा निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात आला आहे. सदरचे टोण्ड दूध हे पाश्चराईज्ड, बॅक्टोफ्युज व स्पेशल होमोजिनाइज्ड बरोबरच व्हिटॅमिन ‘ए’ व ‘डी’ ने फोर्टीफाईड केले असल्याने त्याची सेल्फ लाईफ वाढून गुणवत्ता देखील चांगली राहणार आहे.
Leave a Reply