
सी.पी.आर.रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांना मोफत दूध वाटप
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) नेहमी विविध सामजिक उपक्रम राबवित असतो. त्या अनुषंगाने जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथील रुग्ण,नातेवाईक व कर्मचारी यांना मोफत ‘गोकुळ फ्लेव्हर मिल्क’ दुधाचे वाटप गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व छत्रपती शाहू वैद्य.महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, दूध हे आपल्या जीवनाचा आणि आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. दूधाचा मानवी जीवनाशी अगदी प्राचीन कालखंडापासून संबंध असून मनुष्याच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जीवनातील प्रत्येक दिवसाची सुरुवात दुधाच्या पोषणाने केली पाहिजे, असे मनोगत व्यक्त केले व दूध आपल्या पर्यंत पोहोचवले त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच संबंधित घटकांचे आभार मानले व जागतिक दुग्ध दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे म्हैस दूध वाढ कार्यक्रमअंतर्गत रूट सुपरवायझर, संकलन अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, छत्रपती शाहू वैद्य. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर,कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, सी.पी.आरचे अधीक्षक डॉ. शिशिर निरगुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अभिषेक पाटील, सी.पी.आर.चे बंटी सावंत व संघाचे व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.
Leave a Reply