क्रीडाई कोल्हापूर च्या वतीने दालन 2015 प्रदर्शनाचे आयोजन

 

IMG_20151202_125230कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा बांधकाम प्रदर्शनाचे क्रीडाई च्या वतीने येत्या २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान न्यू शाहूपुरी जिमखाना मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. चार दिवसीय या प्रदर्शनात १६३ स्टॉल्स असणार आहेत.या प्रदर्शनात देश पातळीवरील बांधकामाशी निगडीत आधुनिक टिकाऊ व वाजवी दरातील साहित्य प्रकल्प,व अनेक कंपन्यांचा,अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्थांचा सहभाग असेल जेणे करून कोल्हापूर तसेच परिसरातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतील.हे प्रदर्शन दर ३ वर्षांनी भरविले जाते.यंदा या प्रदर्शनाचे नववे वर्ष असून गेल्या सर्व प्रदर्शनास लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे.तसा यावर्षीही लाभेल असा विश्वास दालन चे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला.
क्रीडाईचा उद्देश सांगताना महेश यादव म्हणाले अकरा मजली इमारती जशा महत्वाच्या तशीच येथील वृक्ष संपदा.कलानगरी,क्रीडानगरी,उद्योग नगरी अशी वैशिष्ट असणऱ्या कोल्हापूरसाठी बांधकाम व्यावसायिकांसाठी इच्छा अनुभव,कार्य,क्षमता वापरणे हा यापुढील काळातील संस्थेचा सेवा दृष्टीकोन आहे.कोल्हापूरच्या लोकांनी स्मार्ट सिटी बद्दल आपल्या कल्पना सूचना व दृष्टीक्षेप साकारण्यासाठी www.smartcitykolhapur.com ही वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.यावर येणाऱ्या सूचनांचा विचार केला जाईल असे आश्वासनही महापालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिले आहे.असेही महेश यादव यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सुजय होसमणी,सचिव संजय डोईजड,खजानिस निखील शहा,सह खजनीस विवेकानंद पाटील,सह समन्वयक सागर नालंग,संदीप मिरजकर,दालन कमिटी चेअरमन श्रेहांस मगदूम,विश्वजित जाधव,के.पी.खोत,प्रदीप भारमल,अभिजित जाधव,अजय कोरणे,निखील अगरवाल,पवन जामदार,विक्रांत जाधव यांच्यासह सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!