गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्यासोबत ‘फर्टीमिन प्लस’ मिनरल मिक्चर मोफत योजनेचा शुभारंभ

 

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गायी-म्हैशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्यपूरक आहाराची निर्मिती करत असून दूध उत्पादकांच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा केला जातो. अशा महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट या पशुखाद्याचे पोते संघाकडून खरेदी केल्यास त्यासोबत ‘फर्टीमिन प्लस’ या मिनरल मिक्श्चरची १ किलो बॅग आपल्या दूध उत्पादकांना एक महिन्याच्या कालावधीसाठी पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून आज गणेश जयंतीचे औचित्य साधून या योजनेचा शुभारंभ गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला.संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळने गेल्या दोन वर्षापासून पशुखाद्यामध्ये कोणतेही दर वाढ केलेली नसून गोकुळच्या दूध उत्पादकांना सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देणेसाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे. म्हणूनच जिल्ह्यात सुमारे ९० ते ९५ % लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात. दुग्ध व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका गोकुळ नेहमीच घेत असून दूध उत्पादकांच्या फायद्याचे नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्यानुसार गोकुळच्या महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट पशुखाद्यासोबत फर्टीमिन प्लस मिनरल मिक्चर मोफत हि योजना चालू केली असून पशुखाद्याच्या पोत्यामध्येच फर्टीमिन प्लसची दिडशे रुपये किंमतीची १ किलो बॅग मोफत देण्यात आली आहे. या फर्टीमिन प्लसचा परिणाम दुधाळ जनावरांचे दूध, फॅट आणि एस.एन.एफ. वाढीमध्ये दिसणार आहे. यास्तव अत्यंत उपयुक्त असलेल्या फर्टीमिन प्लस या मिनरल मिक्श्चरचा प्रचार व प्रसार वाढावा आणि गोकुळच्या प्रत्येक दूध उत्पादकाने या फर्टीमिन प्लसचा नियमित वापर करावा, हा या योजनेमागील संघाचा महत्वाचा उद्देश असल्याचे श्री डोंगळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!