
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर ही क्रीडानगरी असून येथे अनेक खेळांना राजाश्रय मिळालेला आहे. त्यामुळेच ९ वर्षांपूर्वी कोल्हापूर रन मॅरेथॉन सुरू करण्यात आली. गेल्या ९ वर्षांत या मॅरेथॉनचे महत्त्व वाढत गेले असून, दरवर्षी तिला मोठा प्रतिसाद मिळतो. याच परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना संधी मिळावी यासाठी केएससी रगेडियन कोल्हापूर रन ९ फेब्रुवारी रोजी पोलीस मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.अशी माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण आणि रगेडीयन क्लबचे आकाश कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.ही रन ९ फेब्रुवारी रोजी पोलीस ग्राउंड येथे पहाटे ६ वाजता सुरू होणार आहे.यावेळी आशिष तंबाके,अदित्य शिंदे,ओम कोरगावकर आदी उपस्थित होते.यातील २१ आणि १० किलोमिटर रन सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे तर ५ किलोमिटर रन ही सकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे.यावेळी उद्घाटनाला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.ही मॅरेथॉन कोल्हापूरच्या पर्यटनवाढीस चालना देण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये किमान देशातील ५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. कोल्हापूर रन ही केवळ मॅरेथॉन नसून, हा एक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव आहे. हजारो लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. मॅरेथॉन विजेत्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे गट
ही मॅरेथॉन ५, १० आणि २१ किलोमीटर अशा तीन गटांमध्ये होईल. वयोगट खालीलप्रमाणे असतील –
•१८ वर्षांखालील •१८ ते ३० •३१ ते ४५ •४६ ते ६० •६० वर्षांवरील – (पुरुष व महिला स्वतंत्र गट)
स्पर्धकांसाठी विशेष सुविधा व मनोरंजन
नाव नोंदणी केलेल्या प्रत्येक स्पर्धकास टी-शर्ट, मेडल, टाईम चिप, सर्टिफिकेट, बॅग, रेसचे फोटो आणि अल्पोपहार दिला जाईल.
याव्यतिरिक्त, मॅरेथॉन दिवशी स्पर्धकांसाठी झुंबा, लाईव्ह डिजे, लाईव्ह सिंगिंग, ढोल-ताशा, तुतारी, बेंजो, लेझीम, धुमाळ पथक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमुळे मॅरेथॉन अधिक उत्साहपूर्ण आणि आनंददायी ठरणार आहे.
स्पर्धेचा मार्ग
• ५ किमी: पोलीस ग्राउंड → डीवायपी मॉल (यू-टर्न) → पोलीस ग्राउंड
• १० किमी: पोलीस ग्राउंड → केएसबीपी चौक (यू-टर्न) → पोलीस ग्राउंड
• २१ किमी: पोलीस ग्राउंड → शिवाजी विद्यापीठ (यू-टर्न) → पोलीस ग्राउंड (२ फेऱ्या)
स्पर्धकांनी नाव नोंदणी येथे करावी: स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुकांनी नोंदणीसाठी रगेडियन जिम, येथे भेट द्यावी. अधिक माहितीसाठी www.ruggedian.com या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ७७२२०६७४७७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
आरोग्य आणि तंदुरुस्तीचा संदेश
कोल्हापूरची पारंपरिक तालीम परंपरा आणि क्रीडानगरी म्हणून असलेली ओळख पुढे नेण्यासाठी ही मॅरेथॉन महत्त्वाची आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन एक दिवस स्वतःसाठी राखून ठेवावा, असा संदेश संयोजकांनी दिला आहे.स्पर्धेसाठी डी. वाय. पाटील ग्रुप, एस.जे. आर टायर,आणि डीकॅथलॉन ,रेडिओ मिर्ची यांचे सहकार्य लाभले आहे.या रन मधे कोल्हापूरकरांनी आपल्या कुटुंबियांसमवेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या स्पर्धेसाठी ३०० व्हालिंटीयर कार्यरत असणार आहेत.
Leave a Reply