
कोल्हापूर: आकाश एज्युकेशनल सर्विस लिमिटेड च्या वतीने महाराष्ट्रातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या इच्छुकांसाठी एमएचटी-सीईटी हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे आत्तापर्यंत आकाश एज्युकेशनने जे ई मेन्स ऍडव्हान्स आणि नीट चे प्रशिक्षण दिले आहे याबरोबरच आता एमएचटी-सीईटीच्या प्रशिक्षण केंद्रामुळे इंजिनिअरिंग कडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचा फायदा होणार आहे अशी माहिती व्यवसाय प्रमुख जीन थॉमस जॉन आणि विनय पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.या अभ्यासक्रमांची सुरूवात ही प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी तयारी करणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या आकाशच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड ही टेस्ट प्रिपरेटरी सेवांची राष्ट्रीय अग्रणी संस्था आहे, त्यांनी महाराष्ट्रातील १० वी आणि ११ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CET (सामान्य प्रवेश परीक्षा) अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम विशेषतः अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठीच्या प्रादेशिक प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. इंग्रजी माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या वर्गांना बोर्ड परीक्षेनंतर सुरुवात होईल. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सीबीएससी अभ्यासक्रमासाठी दर्जेदार प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. आपल्या राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण समाधान प्रदान करेल. असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यासाठी इयत्ता ११ वीच्या स्वतंत्र बॅचेस तयार केल्या जातील आणि अध्यापनाचे माध्यम इंग्रजी असेल.
सीईटीमध्ये २०२२ मध्ये ६,०६,७९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४,६७,३७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २०२३ मध्ये ६,३६,८०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी ५,९१,१३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २०२४ मध्ये ७,२५,७७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि ६,७५,३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या प्रशिक्षण केंद्रात इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅचेस चालवल्या जातील. सीईटी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विस्तृत अभ्यासक्रम तयार केला जाईल.
इयत्ता ११ वीच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत असलेल्या विषयांसह (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) उच्च-स्तरीय अध्ययन सामग्री पुरवली जाईल.आकाशद्वारे तयार केलेले अत्यंत आकर्षक परीक्षापत्र असेल.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख, डॉ. एच. आर. राव म्हणाले, “आम्ही विद्यार्थ्यांना उच्च-स्तरीय शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्यास कटिबद्ध आहोत. महाराष्ट्रात सीईटी अभ्यासक्रम सुरू करून, आम्ही राज्यातील इच्छुक विद्यार्थ्यांना भक्कम शैक्षणिक पाया प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतील. आमचे उद्दीष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास करणे आणि त्यांना राज्यातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यास मदत करणे.”
पत्रकार परिषदेस वरूण सोनी, अमित शर्मा, इमरान खान, कुमार चव्हाण ,योगेश पवार उपस्थित होते.
Leave a Reply