
कोल्हापूर: अन्यायकारी शक्तीपीठ महामार्गा विरोधात 12 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक घेण्यात आली . राजर्षी शाहु स्मारक भवन, दसरा चौक येथे पार पडलेल्या या बैठकीला आमदार जयंत आसगावकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांचीही सहउपस्थिती लाभली.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ मार्चला विधानसभेवर धडक मोर्चा नेण्याचा निर्धार करून शेतकऱ्य़ांनी कोल्हापूरातून एल्गार पुकारला आहे. हे आंदोलन काँट्रॅक्टर धार्जिणे सरकार फोडाफोडीच्या माध्यमातून आपल्या हाती ठेवू पाहत असून हा त्यांच्या धोरणाचा भाग आहे. त्यामुळे आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही. सरकारकडून मिळणारा मोबदला नाकारून फक्त शक्तीपीठ रद्द हेच आपल्या सर्वांचे ध्येय असले पाहिजे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले. परभणी धाराशिव नांदेड सोलापूर नाशिक इथून शेतकरी या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपला उद्रेक आणि तीव्र संताप दर्शवला.
यावेळी महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील- किणीकर, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, कॉ. सम्राट मोरे, गिरीश फोंडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक आर.एस. कांबळे, शेतकरी संघाचे संचालक सर्जेराव देसाई यांच्यासह उत्तम सावंत, शिवाजी मगदूम, मच्छिंद्र मुगडे, आनंदा पाटील तसेच विजयकुमार पाटील (सोलापूर), गजेंद्र येलकर (लातूर), शांतीभुषण कच्छवे (परभणी), संभाजी फरताडे (धाराशिव), लालासाहेब शिंदे (बीड), बापूराव ढेरे, (हिंगोली), सुभाष भालेराव (नांदेड) आणि राज्यभरातून अनेक शेतकरी या बैठकीला उपस्थित होते
Leave a Reply