
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने संघाचे माजी संचालक .पी.डी.धुंदरे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने गोकुळच्या वतीने शाल फेटा व महालक्ष्मीची मूर्ती देऊन सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्यात आला. गावामध्ये विविध सहकारी संस्थेची स्थापना करून उत्तम व्यवस्थापनाद्वारे चालवल्या असून पी.डी.धुंदरे हे सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. सहकारी संस्थेमध्ये काम करत असताना दूध उत्पादक व शेतकरी ,गोकुळच्या प्रगतीसाठी त्यांनी बहुमोल योगदान दिलेले आहे. सत्कारास उत्तर देताना पी.डी.धुंदरे म्हणाले, गोकुळमध्ये काम करत असताना जुन्या आणि अनुभवी संचालकांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन आणि अनुभव घेतला. गोकुळमध्ये खूप काही शिकता आले आणि दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी काही योगदान देता आले. संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply