
कोल्हापूर : शिरोली पुलाची येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या सीबीएसई शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य किओस्क मशीन कार्यान्वित केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुमारे ६० प्रकारच्या आरोग्य चाचण्या करण्यासाठी हे मशीन उपयुक्त आहे. देशातील पहिल्या ६० हायब्रीड लर्निंग शाळांमध्ये सिम्बॉलिकचा समावेश आहे. हायब्रिड स्कूल योजनेअंतर्गत किओस्क मशीन मिळालेली सिम्बॉलिक ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव शाळा आहे.आरोग्य किओस्क मशीनचे उद्घाटन संचालक म्रिणाल पाटील यांच्या हस्ते झाले.प्रोफिलॅक्सिस नावाचे हे मशीन एक क्रांतिकारी स्मार्ट डायग्नोस्टिक टूल आहे. जे रक्तदाब, साखर, तापमान आणि खोकला यासारख्या आरोग्य समस्या शोधण्यास सक्षम आहे. शाळेमध्ये शारीरिक आरोग्याचे निरीक्षण करण्यासाठी ते उपयुक्त आहे. रोगांचे लवकर निदान होणे, ही दीर्घकालीन आरोग्य परिणाम सुनिश्चित करण्यासाठी फायदेशिर आहे. स्कूलने सध्या ही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.प्रिव्हेटिव्ह हेल्थकेअरसाठी शाळेच्या वचनबद्धता आणि सर्वांसाठी आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यास आरोग्य किओस्क मशीन फायदेशीर आहे. जिल्ह्यात अशा प्रकारचे पहिलेच प्रोफिलॅक्सिस, एकात्मिक स्मार्ट डायग्नोस्टिक मशीन सिम्बॉलिकमध्ये आहे, ही बाब अभिमानास्पद असल्याचे स्कूलच्या संस्थापिका गीता पाटील यांनी सांगितले.यावेळी उपप्राचार्य तरन्नुम मुल्ला, सुप्रिया पाटील, महेश जंगम, लीना रॉड्रिक्स, कोमल बारड, शितल मांडवकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply