उपमुख्यमंत्री अजित पवार आज आढावा बैठकीसाठी कोल्हापुरात आले होते. कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांची बैठक सुरू होती. मीडियाला बाहेर बाईट देत असताना आधीच दहा मिनिटे कलेक्टर ऑफिसच्या बाहेरील रस्त्यावर पोलिसांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्याचे सांगत वाहनधारकांना जाण्यास मनाई केली. याच्यामध्ये अनेक लहान मुले, महिला ह्या टू व्हीलर वरती उन्हात उभ्या होत्या. काही वेळात नागरिकांना हा त्रास सहन झाल्यामुळे त्यांनी जोर जोरात हॉर्न वाजवायला सुरू केले. तरीदेखील पोलीस रस्त्यावर आडवे उभे होते. पुढे जाऊ देत नव्हते. शेवटी पोलिसांना देखील न जुमानता नागरिकांनी आपली वाहने सुरू करून पुढे नेली. मग पोलिसांना तिथून बाजूला होण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही..
Leave a Reply