
मुंबई :मराठी संस्कृतीचा आत्मा म्हणजे कीर्तन – आणि मराठी मनोरंजनविश्वातील एक मान्यवर चेहरा म्हणजे भरत जाधव. आता हे दोन वेगळ्या क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्वं झी टॉकीजच्या विशेष सादरीकरणात एकत्र येत आहेत.“नाचू कीर्तनाचे रंगी – आता थांबायचं नाय” या भागात पहिल्यांदाच भरत जाधव टीव्हीवर कीर्तनावर आधारित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. रंगभूमी, चित्रपट आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भरत जाधव यांचं हे सूत्रसंचालन त्यांच्याच खास शैलीत पाहायला मिळणार आहे.
या भागात त्यांच्यासोबत असतील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. इंदुरीकर महाराज, जे आपल्या कीर्तनातून अध्यात्म, समाजप्रबोधन आणि समकालीन विषयांवर प्रभावी भाष्य करत असतात. त्यांच्या भाषाशैलीतला समतोल आणि भावना प्रेक्षकांना विचार करायला लावतो.
ही प्रस्तुती विशेष ठरणार आहे, कारण या भागामध्ये भरत जाधव आणि झी स्टुडिओज् प्रस्तुत, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित “आता थांबायचं नाय” या आगामी चित्रपटाच्या सर्जनशील आणि भावविश्वाशी जुळणारं नातं उलगडले आहे.
या चित्रपटाच्या आशयाशी सुसंगत असलेला कीर्तनाचा हा अनुभव प्रेक्षकांच्या मनात निश्चितच एक वेगळी छाप सोडणारा ठरेल.हा मनोरंजनात्मक, विचारप्रवर्तक आणि अध्यात्मिक अनुभव देणारा विशेष भाग प्रेक्षकांनी रविवार, २७ एप्रिल रोजी, संध्याकाळी ६ वाजता फक्त झी टॉकीजवर जरूर पाहावा.दिग्गज अभिनेते भरत जाधव आणि ह. भ. प. इंदुरीकर महाराज यांची ही जोडी – अध्यात्म आणि मराठी मनोरंजनाचा एक अद्वितीय संगम ठरणार आहे.
Leave a Reply