
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र क्रिकेट असोसएशनचे (एमसीए) अध्यक्ष आमदार रोहित पवार, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसएशनचे (केडीसीए) अध्यक्ष माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊसचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांच्या संयुक्तीक प्रयत्नामुळे कोल्हापूर येथे किक्रेट मैदान विकसीत होणारआहे. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसएशनचे (केडीसीए) अध्यक्ष माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊसचे चेअरमन मा डॉ. के.जी.पाटील यांच्या उपस्थिती मध्ये मैदानाच्या विकासाबाबतचा समझोता (MoU) करारा वर स्वाक्षरी करण्यात आल्या.
एमसीएने राज्यभर क्रिकेटसाठी मैदाने विकसित करण्याचे नवीन धोरण निश्चित केले आहे. याच धोरणांतर्गत, कोल्हापूरातील न्यु इन्स्टीटयुट ऑफ टेक्नाॅलाॅजी काॅलेज, उंचगाव येथील मैदानाच्या विकासासाठी रू ७५ लाखा पर्यतचे आर्थीक सहाय्य व मैदाना साठी लागणारी तांत्रीक मशनरी मुख्यत्वे खेळपटृटी साठीचा रोलर, ग्रास कटर, लाॅन मुव्हर इत्यादी साहीत्य पुरवण्याचे मान्य केले आहे एमसीएचे सेक्रेटरी ॲड श्री.कमलेश पिसाळ, न्यु इन्स्टीटयुट ऑफ टेक्नाॅलाॅजी काॅलेजचे डायरेक्टर डॉ संजय दाभोळे आणि केडीसीएचे माजी अध्यक्ष श्री आर ए (बाळ) पाटणकर यांच्या प्रयत्नामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे
या मैदाना मुळे राज्यस्तरीय निमंत्रीत क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करणे सुलभ होईल तसेच खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील त्यामुळे कोल्हापुरातील पुरूष आणि महिला खेळाडूंना विशेषत: ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जात्मक प्रगती साधता येईल या समझोता (MoU) करारा प्रसंगी केडीसीएचे उपाध्यक्ष मा.अभिजीत भोसले सेक्रेटरी मा शीतल भोसले सह सेक्रेटरी मा मदन शेळके व संचालक मंडळ उपस्थितीत होते
हे मैदान विकसीत झाल्यानंतर केडीसीएच्या अंतर्गत तसेच एमसीएच्या निमंत्रित व इतर विविध स्पर्धा आयोजन प्रभावीपणे करता येणार आहे या प्रकल्पाला केडीसीएचे माजी अध्यक्ष श्री. ऋतुराज इंगळे, माजी सेक्रेटरी श्री केदार गयावळ व ज्येष्ठ खेळाडू रमेश हजारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
Leave a Reply