सकल ब्राह्मण समाजाच्यावतीने श्री भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा

 

कोल्हापूर:सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने मंगळवारी श्री भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त शहरातील प्रमुख मार्गावरुन पालखी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये समामाजील बंधु-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते. दरम्यान मंगलधाम येथे सायंकाळी ७ वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळाही धार्मिक वातावरणात पार पडला.ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम), कोल्हापूर चित्पावन संघ, कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वतिने दरवर्षी साजरा होणारा भगवान परशुराम जन्मोत्सव व शिवजयंती सोहळा यंदा मात्र काश्मिर हल्याच्या पार्श्वभुमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. प्रथेनुसार बिनखांबी गणेश मंदिर येथे फुलांनी सजवलेल्या पालखीत श्री परशुरामाच्या पादुका, शिवछत्रपती आणि महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा ठेवण्यात आली. यावेळी जेष्ठ डॉ. नंदकुमार जोशी आणि डॉ. राधिका जोशी यांच्याहस्ते पालखी पुजन करण्यात आले. मंत्रोपचारात, आणि धार्मिक वातावरणात पालखी महाद्वार रोड, ताराबाई रोड, तटाकडील तालीम, निवृत्ती चौक ,कोठीशाळा मार्गे परत मंगलधाम येथे पोहोचली. यानंतर श्रींचा जन्मकाळ सोहळा महिलांच्या उपस्थीतीत पार पडला. त्यानंतर प्रसादाचे वाटप भक्तांना करण्यात आले. दरम्यान सकाळी कत्यायनी येथील श्री परशुराम मंदिर येथे सर्व समाज बांधव भगिनींच्या उपस्थितीत पंचामृत अभिषेक पूजा करण्यात आली.गेल्या मंगळवारी काश्मिर पेहेलगाम येथे दहशतवादी हल्यान २७ निरपराध लोकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे यंदा सकल ब्राह्मण समाजाने परशुराम जन्मोत्सव व शिवजयंती साधेपणाने साजरी केली. पण धार्मिक पालखी सोहळ्यात मात्र दहशतवादी तसेच पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा तरुण कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच निषेधाचे फलकही लावण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!