
कोल्हापूर: कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक घोषित झाली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी, मा.प्रदेश अध्यक्ष रावसाहेबजी दानवे यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर महानगर जिल्हा यांच्याकडे बेळगाव जिल्हा ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रचार व व्यवस्था देखरेख करणेची जबाबदारी सोपवली आहे. या करिता, प्रदेश भाजपाने भाजपा प्रमुख नेते व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष मा.महेशजी जाधव यांची बेळगाव ग्रामीण जिल्हा निवडणूक मुख्य संचालक तथा समन्वयक या निवडणूक पदावर निवड केली. सदर निवड हि मा.प्रदेश अध्यक्ष तसेच मा.राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहा यांच्या प्रमुख निर्देशानुसार करणेत आली. मा.महेश जाधव यांच्याकडे बेळगाव ग्रामीण जिल्हा अंतर्गत ८ विधानसभा मतदार संघाची जबाबदारी निश्चित करणेत आली आहे. मा.महेश जाधव यांनी त्यानुसार कोल्हापूर भाजपा महानगर जिल्हा मधील प्रमुख व जबाबदार भाजपा जिल्हा पदाधिकाऱ्यांची बेळगाव ग्रामीण जिल्हा मधील विविध विधानसभा मतदार संघाचे सहप्रमुख तथा संचालक म्हणून नेमणूक केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तयारी तथा, आढाव्याचे कामकाज गेल्या तीन महिन्याहून अधिक काळ सुरु आहे. सदरची निवडणूक भाजपाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून मा.प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार प्रचार यंत्रणा उभी केली आहे. केंद्रीय मंत्री मा.प्रकाश जावडेकर हे कर्नाटक राज्य विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभारी असून त्यांच्या निर्देशाखाली हि निवडणूक पार पाडली जात आहे. मागील विधानसभेवेळी भाजपाचे ४४ आमदार निवडूण आले होते,पण यावेळी शतप्रतीशत भाजपा या तत्वानुसार कर्नाटकात भाजपाची सत्ता आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अनुषंगाने प्रदेश भाजपाने महेश जाधव यांच्याकडे बेळगाव ग्रामीण जिल्ह्यातील ८ मतदार संघाची जबाबदारी दिली आहे, व यानुसार गेले महिनाभर त्याचे कामकाज सुरु आहे. मा.महेश जाधव यांनी त्यांच्याकडे असलेल्या बेळगाव ग्रामीण जिल्हा विधानसभा मतदार संघातील समाविष्ट मतदार संघात प्रमुखाची निवड केली आहे, ती अशी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निवडणूक समन्वयक व संचलक म्हणून विजयकांत अगरवाल कित्तूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक समन्वयक व संचलक म्हणून अशोक देसाई , खानापूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक समन्वयक व संचलक म्हणून संतोष लाड बैलहोगल विधानसभा मतदारसंघ निवडणूक समन्वयक व संचलक म्हणून सुभाष रामुगडे ,सौंदत्ती विधानसभा मतदारसंघ निवडणूक समन्वयक व संचलक म्हणून संदीप देसाई, रामदुर्ग विधानसभा मतदारसंघ निवडणूक समन्वयक व संचलक म्हणून हेमंत आराध्ये , गोकाक विधानसभा मतदारसंघ निवडणूक समन्वयक व संचलक म्हणून श्री संतोष भिवटे,अरभावी विधानसभा मतदारसंघ निवडणूक समन्वयक व संचलक म्हणून गणेश देसाई याप्रमाणे निवडणूक समन्वयक व संचालक म्हणून वरीलप्रमाणे भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे, त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कामाची सुरुवात केली आहे. यामध्ये मतदार संघात दौरे करणे, आढावा बैठक घेणे, बूथ रचना करणे, भाजपा स्थानिक पदाधिकारी बैठक व निवडणूक प्रचार यंत्रणा लावणे यासारखे कामकाज सुरु झाले असून मा.महेश जाधव हे स्वत: पत्येक मतदार संघात प्रचारासाठी प्रवास करत आहेत.
येत्या काही दिवसांत या सर्व मतदार संघात मोठ्या प्रमाणात प्रचाराची आघाडी घेऊन सर्वच्या सर्व मतदार संघातील उमेदवार निवडून आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही मा.महेश जाधव यांनी दिली. या संदर्भात पुढील रचना व कामकाज ठरविण्यासाठी आज भाजपा कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी मा.महेश जाधव व सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख उपस्थित होते. निवडणुकीच्या पुढील कामकाज संदर्भात व आजपर्यंत झालेल्या कामकाजाचे आवलोकन करण्यात आले. मा.महेश जाधव यांनी सर्व विधानसभा प्रमुखांना येत्या २० दिवसांत कशा पद्धतीने नियोजन करावे याची माहिती दिली. तसेच मतदार संघात प्रवास, उमेदवार निवडण येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची संघटनात्मक पातळीवर पूर्तता करण्याचे निर्देश दिले. सर्व विधानसभा प्रमुखांनी आपल्या मतदार संघातील कामकाजाचा आढावा मा.महेश जाधव यांचेकडे सादर केला. या सर्व मतदार संघातील कामकाजाचे रिपोर्टिंग मा.महेश जाधव हे पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश संघटन सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांचेकडे सादर करणार आहेत.
या महत्वपूर्ण बैठकीसाठी प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस संतोष भिवटे, सुभाष रामुगडे, उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, गणेश देसाई, अमोल पालोजी, उद्योग आघाडी अध्यक्ष विजय अग्रवाल, व्यापारी आघाडी अध्यक्ष संतोष लाड आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply