५ वी १२ वी पर्यंत विद्यार्थी घडवण्यासाठी आकाश एज्युकेशन कडून अँथे परीक्षा; २.५० कोटी रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती 

 

कोल्हापूर :  मागील १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत आलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड या देशातील अग्रगण्य टेस्ट प्रिपरेटरी संस्थेने आपल्या प्रतिष्ठित उपक्रमाची अँथे २०२५ म्हणजे आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झामची घोषणा केली आहे. भारतीय शैक्षणिक क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची वार्षिक परीक्षा असलेल्या अँथे चा उद्देश इयत्ता ५ वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाण्यसाठी सक्षम करणे हा आहे.गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अँथेद्वारे विद्यार्थ्यांना ₹२५० कोटींपर्यंतचे १००% स्कॉलरशिप्स आणि ₹२.५ कोटींच्या रोख पारितोषिकांची संधी दिली जात आहे. ही संधी क्लासरूम, आकाश डिजिटल आणि इन्विक्टस कोर्सेससाठी उपलब्ध आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना नीट, जेईई, सीईटी आणि एनटीएसई ऑलिंपियाड्ससारख्या स्पर्धा परीक्षांसाठी आकाशच्या अनुभवी मार्गदर्शकांकडून दर्जेदार मार्गदर्शन मिळते.‘आकाश’ आता इन्व्हिक्टस एस टेस्ट नावाची एक शिष्यवृत्ती परीक्षा देखील सुरू करत आहे. ही परीक्षा ८ वी ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाश इन्व्हिक्टस जेईई अँडव्हान्स ची तयारीस मदत करेल. ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता व शिष्यवृत्ती परीक्षा २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींमध्ये उपलब्ध असेल.

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे सीईओ आणि एमडी  दीपक मेहरोत्रा यांनी सांगितलं की, “अँथे हा आज भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी संधीचं प्रतीक बनला आहे. मागील १६ वर्षांपासून आम्ही हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्याकरिता मदत करत आहोत.

या वर्षापासून आम्ही ‘इन्व्हिक्टस एस टेस्ट’ देखील सुरू करत आहोत, जो स्कॉलरशिप आणि आकाश इन्व्हिक्टस कोर्समध्ये प्रवेशासाठी घेतला जाईल.

अँथेची ऑनलाइन परीक्षा ४ ते १२ ऑक्टोबर दरम्यान होईल आणि विद्यार्थी त्यांना सोयीच्या वेळेत एक तासाचं स्लॉट निवडून परीक्षा देऊ शकतील. ऑफलाइन परीक्षा ५ आणि १२ ऑक्टोबर रोजी भारतातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४१५ पेक्षा जास्त आकाश च्या सर्व केंद्रांवर होणार आहे.

अँथेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत सहसंचालक अमित कुमार शर्मा,ॲकॅडमीक हेड मेडिकल विंग चे अमजद अली, ॲकॅडमीक हेड इंजिनिअर विंगचे मनिष कुमार,कोल्हापूरचे शाखा अधिकारी मोहन शिंदे, सांगलीचे शाखा व्यवस्थापक कुमार चव्हाण आदींनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!