धान्य व्यापारी मंडळाचा यंदा पर्यावरणपुरक वरदविनायक : महाराष्ट्रातील पहिलींच अशी गणेशमूर्ती

 

कोल्हापुर : १०० % पर्यावरण पूरक, निसर्गनिर्मित वस्तु ,नैसर्गिक रंग यांच्या माध्यमातून बनवलेली श्री गणेशाची मूर्ती असावी, तिची वैदिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा आणि दैनंदिन पूजा अर्चा व्हावी, जल प्रदूषण होणार नाही, विसर्जनाच्या वेळी होणारे प्रदुषण टाळण्याच्या उद्देश्याने धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाने पर्यावरण पूरक आणि कायमस्वरूपी श्रीच्या मूर्ती ” चा प्रकल्प हाती घेतला. मागील वर्षी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मातीपूजन करून श्रीच्या मूर्तीच्या कामाची सुरुवात करण्यात आली असून झाडांची गळलेली पानं फुले त्याचबरोबर वेली आणि साली मुंगलीनेची चेचून
घेऊन त्यांचे मिश्रण करण्यात आले आहे मिश्रणाची पेस्ट तयार करण्यासाठी त्यामध्ये बाभळीच्या डिंकाचा वापर केलेला आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास ७ ते ८ महिन्याचा कालावधी लागला.मूर्तीच्या टिकाऊपणासाठी कागद, कागदी पट्टा, लाकूड यांचा वापर केलेला आहे.मूर्ती सुबक आणि देखणी दिसण्यासाठी मूर्तीच्या वरती पानं, पुल, वेल झाडांची साल्याची पेस्ट करून त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्याचा वापर करून मूर्ती फिनिशिंग करण्यात आली आहे.रंग कामासाठी डाळींब , पारंपारिक बळूच्या रंगाचा वापर करण्यात आलेला आहे. नैसर्गिक साहित्याचा वापर केल्यामुळे १०० वर्षापेक्षा अधिक काळ टिकू शकणारी पर्यावरण गणेशमूर्ती कोल्हापूर मधील सुप्रसिद्ध मुर्तीकर संदीप कातवरे यांनी बनवलेली आहे.  मूर्तीच्या पोटामध्ये श्रीयंत्र गणेशयंत्र अशा अनेक यंत्रांचा समावेश आहे *स्थैर्य आणि पराक्रमाचे प्रतिक*
हत्तीचे मुख सिंहाचा पंजा अशा प्रकारच्या दशमुखी सव्वा फुट उंच सागवान लाकडाच्या पाटाची रचना केलेली असून याच पाटावरती या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.शुक्रवार दि १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मिरजकर तिकटी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीने भव्य आगमन सोहळा होणार आहे . मिरवणूक सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी विश्व वारकरी जिल्हाध्यक्ष ओंकार महाराज सूर्यवंशी यांच्यासह ८ ते १५ वयोगटातील बालकलाकरांची वारकरी दिंडी ३१,३२ पावलाचं प्रकार, जुगलबंदी पावली,२४ मुलांचा मानवी रथ, मानवी गरुड, संगितमय खो- खो, यासारख्या पारंपारिक वाद्यांचा समावेश केला आहे. लक्ष्मीपुरी मधील धान्य व्यापारी बालकल्याण संस्थेच्या इमारतीमधील सुसज्ज वरदविनायक मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. उत्सव काळामध्ये लक्ष्मीपुरी धान्यलाईन येथे भव्य मंडपामध्ये श्रींची मूर्ती गणेशभक्तांच्या दर्शनासाठी खुली केली जाणार आहे. नैसर्गिक सुबक, देखणी, वजनांने हलक्या श्रींच्या मुतीच्या दर्शनांचा लाभ१६ ऑगस्टपासून गणेशभक्तांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!