सेंटर्ड क्लब ग्लोबल ट्रस्टचा यंदाचा उ‌द्योगरत्न पुरस्कार उ‌द्योगपती मंगेश पाटील यांना जाहीर

 

कोल्हापूर: यावर्षीचा उ‌द्योगरत्न पुरस्कार सुप्रसिद्ध उ‌द्योगपती मंगेश पाटील यांना सेंटर्ड क्लब ग्लोबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक अशोकजी दुगाडे यांच्या शुभहस्ते आणि पितांबरीचे सर्वेसर्वा रवींद्र प्रभुदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत, शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे. याच बरोबर बेस्ट सॅटर्डे क्लब मेंबर पुरस्कार देखील वितरित करण्यात येईल.
कोल्हापूरचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या उ‌द्योजकांना सॅटर्डे क्लब तर्फे दरवर्षी गौरविण्यात येते. उ‌द्योजक, व्यापारी आणि स्टार्टअप्स यांच्या वाढीसाठी कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, कोल्हापूर तर्फे २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजता यंदाचा उ‌द्योगरत्न मौर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मंगेश पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम हॉटेल फर्न, मार्केट यार्ड समोर, कोल्हापूर येथे संपन्न होणार असून हा पुरस्कार सॅटर्डे क्लबच्या फेसबुक पेजवर पण लाईव्ह प्रसारित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक अशोकजी दुगाडे यांच्या शुभहस्ते आणि पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला जाणार आहे. हा सोहळा सॅटर्डे क्लबचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि ट्रस्टी श्री अशोक दुगाडे यांच्या अध्यक्षतेखाली, आणि. रवींद्र प्रभुदेसाई (ट्रस्टी, सेंटर्डे क्लब, चेअरमन -पितांबरी), सुहास फडणीस (सेक्रेटरी जनरल, सेंटर्ड क्लब), केदार साखरे (डेप्युटी सेक्रेटरी जनरल, सॅटर्डे क्लब), योगेश देशपांडे (रिजन हेड कोल्हापूर वेस्ट रिजन), सौ. दिपा देशपांडे (चेअरपर्सन, कोल्हापूर चॅप्टर), सॅटर्डे क्लबचे पदाधिकारी सदस्य आणि अनेक उ‌द्योजक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल. अशी माहिती विभाग प्रमुख योगेश देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी अमेय गोडे, दिपा देशपांडे, इंद्रानील बंकापुरे, सुदर्शन म्हाकवे ,आनंद साळुंखे, रोहन शेटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!