कुलपती डॉ. संजय डी.पाटील यांचा ‘क्यूएस आय-गेज’ संचालकांकडून गौरव

 

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड श्रेणी प्राप्त केल्याबद्दल ‘क्यूएस आय-गेज’चे व्यवस्थापकीय संचालक रविन नायर व सहाय्यक संचालक सुबिन राज यांनी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना सन्मानित केले. नायर यांनी विद्यापीठाच्या सर्वोत्तम कामगिरीचा गौरव करत डॉ. पाटील यांच्याकडे ‘क्यूएस आय-गेज’ प्रमाणपत्र प्रदान केले.
कदमवाडी येथील डी वाय पाटील कॉलेज सभागृहात हा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी बेंगळुरहून ‘क्यूएस आय-गेज’ चे व्यवस्थापकीय संचालक रविन नायर व सहाय्यक संचालक सुबिन राज उपस्थित होते. विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आय. क्यू. ए. सी. संचालक डॉ. शिंपा शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय डी. पाटील यांना मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी सन्मानित केले.रवीन नायर म्हणाले, डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकन मिळवणे हे अतिशय कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यापीठाची विविध पातळीवर असलेली गुणवत्ता सिद्ध होते. कुलगुरू डॉ. शर्मा म्हणाले, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने प्रगतीचे नव -नवीन टप्पे गाठले आहे. हे मानांकन विद्यापीठाला आणखी वेगाने प्रगती करण्याची प्रेरणा देईल. येत्या काळात विद्यापीठाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित प्रयत्न करू.या गौरव सोहळ्याला डी. वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, अजय डोईजड, सोहन शिरगावकर, ॲड. रवी शिराळकर, सायबर कॉलेजचे डॉ. सर्मा, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, डॉ. आर. बी. नेरली यांच्यासह डी. वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य, रजिस्ट्रार, विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी आदी उपस्थित होते.डॉ. मान्या मिध्धा व डॉ.ओमसिंग शेखावत यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!