कोल्हापूर: गेल्या पन्नास वर्षात मंडळाने समाजातील सर्वांना एकत्र आणत, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशभक्तीचा संदेश दिला आहे. यंदाच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवात आणखी वैभव, एकोपा व सेवा वृत्ती घेऊन हा उत्सव साजरा होणार आहे. डॉल्बीला फाटा देत श्री गणेश आगमन व विसर्जन सोहळा भव्य मिरवणूकीने, पारंपारिक वाद्याच्या गजरात भव्य आतिषबाजीसह हा सोहळा होणार आहे. पहिल्यांदाच पुरुषांसोबत सर्व महिलांनीही तितक्याच उत्साहाने या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
रोज नित्य नियमाने श्रींना अभिषेक, संततधार, अथर्वशीष पठण, श्री गणेशयाग या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गणेशोत्सवानिमित्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरसालाप्रमाणे याही वर्षी प्रसादाचे वाटप वृध्दाश्रमात व अंध शाळेत ही केले जाणार आहे. तसेच एका शाळेतील कर्मचाऱ्याच्या होतकरु व विद्वान मुलीच्या शालेय शिक्षणाचा खर्च करण्याचे प्रयोजन केले आहे.
लहान मुलांसाठी धार्मिक श्लोक व ड्रॉईंग स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महिलांसाठी पारंपारिक झिम्मा फुगडी स्पर्धाचे आयोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखाव्याची परंपरा जपत मोठ्या प्रमाणात तांत्रिक देखाव्याचे निर्माण केले आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच अबाल वृद्ध आणि बालमुंसाठी जिनिज मॅजिक व्हील,२५ फूट इजिप्त पिरॅमिड आणि ममी हा अनोखा देखावा साकारला आहे. हे या वर्षीचे वेगळे आकर्षण ठरणार आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष मदन अथणे, सचिव प्रसाद रोटे, खजानिस अभि मुनगेटी आदी उपस्थित होते.

Leave a Reply