तीन हजार विद्यार्थ्यांनी दिली ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परिक्षा

 

कोल्हापूर :साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षा उत्साहात संपन्न झाली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून बारावी विज्ञान शाखेतील 110 महविद्यालयांमधून 3285 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करून या विषयाची आवड निर्माण व्हावी व पुढील परीक्षांचा उत्तम पाया रचला जावा यासाठी हि परीक्षा घेतली जाते. रविवार 7 डिसेंबर रोजी ही परीक्षा संपन्न झाली. परीक्षेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना नेण्या-आणण्याच्या सुविधेसोबत भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेनंतर होणाऱ्या एमएचटी-सीईटी (MHT-CET) क्रॅश कोर्स ला सहभाग नोंदवण्यासाठी सुलभ होणार आहे. त्याचबरोबर बारावी बोर्ड व सीईटी (CET) व जेईई (JEE) परीक्षेसाठीसुद्धा या परीक्षेचा अनुभव उपयुक्त ठरणार आहे. परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेनंतर आयआयटी (IIT) च्या तज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात आले व गणित विषयाला उपयुक्त अशा नोट्स देण्यात आल्या.डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी परिक्षास्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच सायन्स कॉलेज प्रतिनिधींशी संवाद साधून उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले. कॅम्पस संचालक डॉ.अभिजीत माने,प्राचार्य डॉ. सुरेश डी. माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. सर्व ऍडमिशन समन्वयक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

One response to “तीन हजार विद्यार्थ्यांनी दिली ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परिक्षा”

  1. F666bet – aight, same vibe as f666, but focused on betting. Pretty slick interface, good odds on most sports. Haven’t hit the jackpot yet, but I’m hopin’! Definitely worth a look if you’re into sports betting. f666bet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!