कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस पक्षाची शहराच्या विकासाची संकल्पना मांडण्याासाठी खासदार शाहु छत्रपती महाराज यांच्यासह पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ऋतुराज संजय पाटील उपस्थित होते.
कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा बंद खोलीत न करता तो जनतेतूनच ठरावा या भूमिकेतून “कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!” हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. शहराच्या विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षा, संकल्पना आणि सूचना थेट स्विकारून त्याच आधारावर काँग्रेस पक्षाचा कोल्हापूर महानगरपालिकेसाठीचा जाहीरनामा तयार केला जाणार आहे.
या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, आनंद माने, एड. तौफिक मुल्लाणी, दौलत देसाई, राहुल माने, भारतीताई पवार, सरलाताई पाटील, इंद्रजीत बोंद्रे, बाळासाहेब सरनाईक, दुर्वासबापू कदम, संजय मोहीते, प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, शिवानंद बनछोडे, मोहन सालपे, भरत रसाळे, बयाजी शेळके, अनुप पाटील आदी उपस्थित होते.
