प्रशासकामार्फत महायुतीचा मनमानी आणि भ्रष्ट कारभार: आमदार सतेज पाटील 

 

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासकाच्या आडून महायुती सरकारने केलेल्या मनमानी व भ्रष्ट कारभाराचा आमदार जयंत आसगावकर आणि ऋतुराज संजय पाटील यांच्या उपस्थितीत आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत पंचनामा केला.

शहरातील खड्डेमय रस्ते, अस्वच्छता, कचरा व्यवस्थापनातील अपयश, भ्रष्टाचार, टक्केवारी आणि शेकडो कोटींच्या खर्चानंतरही झालेला निकृष्ट विकास यांचा पर्दाफाश यावेळी केला. प्रशासकराजमुळे कोल्हापूर शहराची दुर्दशा झाली असून, याला थेट महायुती सरकारच जबाबदार आहे त्यामुळे “१५ जानेवारी, कॉँग्रेसच भारी ठरणार !” असा विश्वास व्यक्त केला.यावेळी राजेश लाटकर, दौलत देसाई, सुर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, आनंद माने, माजी महापौर वंदना बुचडे, जयश्री सोनवणे, स्वाती यवलुजे, शोभाताई बोंद्रे, यांच्यासह हरिदास सोनवणे, भारती पवार, सरलाताई पाटील, भरत रसाळे, बाळासाहेब सरनाईक, वेदवती मोहीते आदी उपस्थित होते. तसेच धनंजय महाडिक काय बोलतात ते त्यांना लक्षात येत नाही असा टोला देखील आमदार सतेज पाटील यांनी लगावला.

Comments are closed.

error: Content is protected !!