कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रचारसभेला खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील उपस्थित होते.
कोल्हापूरच्या विकासासाठी तयार केलेला जाहीरनामा हा आदर्श जाहीरनामा असून कोल्हापूर शहराचा सर्वांगिण विकासासाठी काँग्रेस- शिवसेनेच्या उमेदवारांना विजय करून राज्यासमोर आदर्श निर्माण करावा असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी मतदारांना केले. मिरजकर तिकटी येथील सभेत ते बोलत होते.
विरोधक हे माझ्यावर टिका करण्यात व्यस्त आहेत. मात्र मला कोल्हापूरकरांच्या आशिर्वादाने आणि साथीने शहराचा विकास करायचा आहे. याकरता काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी शिवसना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे, जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, कॉ. दिलीप पवार, कॉ. उदय नारकर, सुनिल मोदी, कॉ. रघुनाथ कांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, आनंद माने, सागर चव्हाण, बाबासाहेब देवकर, राजेंद्र ठोंबरे, आनंदराव कोरडे, सुभाष पाटील, शरद माळी, मोहन पिसाळ, विलास मेथे, अजिंक्य निकम, अर्जुन घोरपडे, सचिन मोरे, बाळासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लाणी, विनायक घोरपडे यांच्यासह पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
