कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी या भव्य कृषी व पशूप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “भीमा कृषी व पशू २०२६” प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशी शनिवारी मेरी वेदर मैदानावर गर्दी केली होती. दोनशे हून अधिक महिला बचत गटाचे स्टॉल, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग,अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. खासदार ध १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह लोकांनी मेरी वेदर मैदानावर तुफान गर्दी झाली आहे.दोन दिवसात उच्चांकी तांदूळाची विक्री झाली आहे.आणि बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून मोठी विक्री झाली आहे.प्रदर्शन पाहण्यासाठी आणि खाद्य पदार्थांवर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर मेरी वेदर मैदानावर गर्दी करत आहेत.भारतातील सर्वात मोठा अमेरिकन आठ वर्षाचा साडेपाच फुटाचा इग्वाना (सरडा,चार वर्षाचा आणि पाच महिन्याचा सरडा आकर्षण आहे. हे तीन सरडे प्रदर्शनात आणण्यात आला असून हे तीन सरडे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत. पहिल्याच दिवशी सरडा पाहण्यासाठी लोकांनी, शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. प्रदर्शनात आलेला हिरवा सरडा चार महिन्याचा असून त्याची लांबी दोन फूट आहे चार वर्षानंतर तो चार फुटाचा आणि आठ वर्षानंतर तो सहा फुटाचा होतो. यात पाच महिन्याचा सरडा पाव किलो वजनाचा आहे.चार वर्षाचा सरडा चार फुटाचा ९ किलो वजनाचा आहे. तर आठ वर्षाचा सरडा पाच फुटाचा असून त्याचे वजन २२ किलो आहे. हे पूर्ण शाकाहारी असून भोपळा, कोथिंबीर, मेथीची भाजी, आणि अन्य भाजीपाला खातात. दिवसातून दोन वेळा सकाळी दहा वाजता आणि रात्री आठ वाजता त्यांना खाद्य पदार्थ द्यावे कोल्हापूर मधील किशोर वसंत चव्हाण सध्या मुंबईत राहत असून त्यांनी मुंबई येथे हे सरडे लहानपणापासून पाळले आहेत. या सरड्यांना मालकाची बोलीभाषा समजते हे सरडे विषारी नसून ते वर्षातून दोन वेळा ३५ अंडी घालतात. यांचे रक्त थंड असल्याने त्यांना उष्णतेची गरज असते.चंदगड येथील ७५ हजार रुपये किंमतीचे ३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) पन्हाळा येथील ९० किलोचा बोकड भादोले येथील १२० किलो वजनाचा बिटल बोकड,७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण*७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. आजरा दरडेवाडी येथील पाच वर्षाचा सर्जा काळा बैल,दहा महिन्याचा गीर बैल,१४ महिन्याचे ब्ल्यू गोल्ड मकाऊ पोपट (पॅरोट) हरियाणाचा मुरा जातीचा युवराज रेडा,साडेचार वर्षाचा २८ महिन्याचा गडहिंग्लजचा सुलतान रेडा, हसुर बुद्रुक येथील २८ महिन्याचा एक टन वजनाचा मुरहा रेडा, १४७० किलो वजनाचा ४ वर्षाचा गोलू मुरा रेडा,८०० किलो वजनाचा जाफराराबादी पंढरपूर रेडा, खास आकर्षण आहेत.
