कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतुराज संजय पाटील, राजूबाबा आवळे, राजीव किसन आवळे यांच्यासह आमदार सतेज पाटील उपस्थित होते.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील यश हे सर्वांच्या एकजूटीचे फलित आहे. एकजुटीच्या ताकदीवर महाविकास आघाडी आणि मित्रपक्षाचा अंकुश सत्ताधाऱ्यांवर ठेवू. त्यामुळे येणारा काळ संघर्षाचा असून काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी याची तयारी ठेवली पाहीजे अशा भावना आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या.धनशक्ती विरूध्द जनशक्तीच्या लढाई मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील यश हे सर्वांच्या एकजूटीचे फलित आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी एकजुटीच्या ताकदीवर महाविकास आघाडी आणि मित्रपक्षाचा अंकुश सत्ताधाऱ्यांवर ठेवू.सत्ता व संपत्तीच्या जोरावर सामान्य जनता वेठीस धरली जात आहे. अनेक प्रश्न निर्माण झाले असून जनतेला विश्वासात घेऊन या प्रश्नासाठी लढाई लढावी लागणार आहे. असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, शिवसेनेचे गटनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, राहुल बजरंग देसाई, देवयानी साळोखे, स्मिता गवळी, उदयराव पाटील- सडोलीकर, एम.आर. पाटील, पी.डी. धुंदरे, सदाशिवराव चरापले, विश्वनाथ पाटील, बजरंग पाटील, गोपाळराव पाटील, मानसिंगराव पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक राजू लाटकर, इंद्रजीत बोंद्रे, तौफिक मुल्लाणी, यांच्यासह सर्व नगरसेवक, सर्व तालुकाध्यक्ष, गोकुळ दूध संघ, बिद्री, भोगावती, डी. वाय. पाटील सहकारी कारखान्याचे सर्व संचालक, सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनशक्ती विरूध्द जनशक्तीच्या लढाई मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील यश हे सर्वांच्या एकजूटीचे फलित आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी एकजुटीच्या ताकदीवर महाविकास आघाडी आणि मित्रपक्षाचा अंकुश सत्ताधाऱ्यांवर ठेवू.
सत्ता व संपत्तीच्या जोरावर सामान्य जनता वेठीस धरली जात आहे. अनेक प्रश्न निर्माण झाले असून जनतेला विश्वासात घेऊन या प्रश्नासाठी लढाई लढावी लागणार आहे.
