ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आ. सतेज पाटील गटाचा १३ पैकी १० ग्रामपंचायतींवर विजय

 

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या गटानें दमदार कामगिरी करत राजकीय वर्चस्व कायम राखले. १३ जागांपैकी तब्बल १० ठिकाणी त्यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाल्याने पाटील गटाची ताकद पुन्हा अधोरेखित झाली.करवीर तालुक्यातील तेरा गावांमध्ये झालेल्या या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. हणबरवाडी येथे सरपंचपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत बाबुराव वाडकर यांनी विजय मिळवत पाटील गटाची बाजू भक्कम ठेवली. विशेष म्हणजे, यापूर्वी माजी सरपंच कुमार कोराणे यांच्यावर अविश्वास ठराव झाल्यानंतरही पुन्हा पाटील गटालाच यश मिळाले.इतर निकालांमध्ये वळीवडे येथून महेश शेळके, चिंचवाड येथून अण्णाप्पा कोळी , मानसी मांडरेकर, वसगडे येथून सचिन कांबळे, निशिकांत कांबळे, शामराव कोळी, सरनोबतवाडी येथून सागर गजबर, नेर्ली येथून दयानंद जाधव, गांधीनगर येथून अशोक देवकुळे हे विजयी झाले आहेत. विरोधी गटाच्या उमेदवारांनी फक्त तीन ठिकाणी बाजी मारली आहे. एकूण चित्र पाहता कोल्हापूर दक्षिणमध्ये आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची पकड कायम असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले.दरम्यान, विजयी उमेदवारांनी अजिंक्यतारा कार्यालयात भेट दिली. यावेळी जोरदार फटाक्याची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वतीन कोल्हापूर दक्षिण ग्रामीणचे संपर्कप्रमुख बजरंग रणदिवे यांनी त्यांचा सत्कार केला.

Comments are closed.

error: Content is protected !!