बंगळुरू : शिक्षण क्षेत्र आणि प्रत्यक्ष वास्तव जगातील व्यवहार्यता तसेच भविष्यकालीन कौशल्यांमधील दरी भरून काढण्यासाठी गोकुला एज्युकेशन फाउंडेशन (मेडिकल)ने एक निर्णायक पाऊल उचलले आहे. रामय्या युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, रामय्या मेडिकल कॉलेज आणि रामय्या मेमोरियल हॉस्पिटल यांचे व्यवस्थापन करणाऱ्या गोकुला एज्युकेशन फाउंडेशनने आता युनिव्हर्सिटी अॅट अल्बनी, स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क या अग्रगण्य सार्वजनिक संशोधन विद्यापीठाशी भागीदारी करून रामय्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंट (RISM) या बंगळुरूमधील ‘डीम्ड-टू-बी’ विद्यापीठाची स्थापना केली आहे. अत्याधुनिक STEM आणि व्यवस्थापन संस्थेच्या रूपात संकल्पित RISM, जागतिक मानकांशी सुसंगत, उद्योगाभिमुख शिक्षण देईल. यामध्ये संशोधन आणि प्रत्यक्षातील प्रयोगावर विशेष भर असेल आणि विद्यार्थ्यांना वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिक्षेत्रासाठी तयार केले जाईल. विद्यापीठ आपले पहिले शैक्षणिक सत्र ऑगस्ट 2026 मध्ये सुरू करेल.RISM मध्ये “Relevance” अर्थात संयुक्तिकपणा ही संकल्पना प्रत्येक अभ्यासक्रमाच्या पायाभूत रचनेत एकात्मिक व्यवसाय आणि व्यवस्थापन-प्रणीत दृष्टिकोनाद्वारे समाविष्ट केली जाईल. प्रत्येक अभ्यासक्रमात सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष उद्योगक्षेत्राचा अनुभव अंतर्भूत असेल. त्यामुळे शिक्षण उपयोजित आणि परिणामाभिमुख राहील. विद्यार्थ्यांना ‘मेंटॉर प्राध्यापक’ तसेच उद्योगक्षेत्रातील अग्रणींमधून निवडलेले आणि प्रत्येक विभागात औपचारिक प्राध्यापक भूमिकेत कार्यरत अशा ‘प्रोफेसर्स ऑफ प्रॅक्टिस’ यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल. हा एक नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. यासोबतच, ट्रान्सलेशनल रिसर्च विद्यापीठाच्या शैक्षणिक चौकटीचा मुख्य आधार असेल आणि अभ्यासक्रम रचना आणि प्रत्यक्ष परिणाम या दोन्ही गोष्टींना आकार देईल. या एकात्मिक दृष्टिकोनाद्वारे RISM उद्योजकीय संदर्भ, शैक्षणिक कठोरता आणि ट्रान्सलेशनल रिसर्च यांचा अखंड संगम असलेली शिक्षण परिसंस्था निर्माण करण्याचा उद्देश ठेवते
या स्थापनेबाबत बोलताना गोकुला एज्युकेशन फाउंडेशन (मेडिकल) चे कार्यकारी संचालक आणि मुख्य धोरण अधिकारी गुरूचरण गोलेरकेरी म्हणाले, “आपण एका वेगाने बदलणाऱ्या आणि खोलपणे एकमेकांशी जोडलेल्या जागतिक वातावरणात काम करत आहोत. विविध विद्या शाखा, उद्योग आणि भौगोलिक सीमांमधील सीमा तिथे वेगाने नाहीशा होत आहेत. पारंपरिक शिक्षण मॉडेल्स या नव्या वास्तवासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याकरता पुरेशी पडत नाहीयत. तंत्रज्ञान, व्यवसाय आणि उपयोजित शिक्षण यांचे एकत्रीकरण करून प्रत्यक्ष वास्तविक जगात कसे काम केले जाते आणि ते कसे बदलत आहे याचे प्रतिबिंब असलेली परिसंस्था उभारून RISM द्वारे आम्ही या बदलाला प्रतिसाद देत आहोत. रोजगार बाजारपेठेशी सुसंगतता महत्त्वाची असली तरी, आमचे मोठे लक्ष मूलभूत ज्ञान, चिकित्सक विचार आणि शिकण्याची लवचिकता मजबूत करण्यावर आहे. स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यार्थ्यांना तांत्रिक बदलांच्या अग्रभागी कार्य करण्यास सक्षम करेल. त्यामध्ये प्रोग्रामिंग, अल्गोरिदम्स आणि डेटा यामध्ये भक्कम पाया घडवला जाईल, तसेच मशीन लर्निंग, ऑटोमेशन आणि मानव-रोबोट परस्परसंवाद यामध्ये उपयोजित अनुभव दिला जाईल. स्कूल ऑफ एरोस्पेस इंजिनिअरिंग एरोनॉटिकल आणि अॅपस्ट्रोनॉटिकल क्षेत्रांमध्ये सखोल शिक्षण देईल. यामध्ये फ्लाइट सिस्टम्स, स्पेसक्राफ्ट डिझाइन, सॅटेलाइट टेक्नॉलॉजीज आणि अंतराळ संशोधन यांचा समावेश असेल. स्कूल ऑफ बिझनेस आधुनिक उद्योगांसाठी विश्लेषणात्मक, व्यवस्थापकीय आणि धोरणात्मक कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल. यामध्ये कॅम्पसवरील उद्योग-प्रायोजित शिक्षण केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक आव्हानांचा सामना करणे शिकायला मिळेल. त्यात तंत्र उद्योजकतेचे व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे. युनिव्हर्सिटी अॅट अल्बनी सोबतच्या ज्ञान भागीदारीवर आधारित जागतिक स्तरावर जोडलेल्या आणि उद्योग-समाविष्ट शिक्षण परिसंस्थेत या सर्व शाखांना एकत्र आणण्याच्या पद्धतीत RISM ची वेगळी ओळख जपलेली आहे.यावेळी बोलताना युनिव्हर्सिटी ॲट अल्बनीचे अध्यक्ष हाविदान रोड्रिगेज म्हणाले, “युनिव्हर्सिटी ॲट अल्बनीला रामय्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंटसोबत नवीन ज्ञान भागीदारीत प्रवेश करताना अभिमान वाटत आहे. अध्यापन, संशोधन आणि उद्योग-सुसंगत शिक्षण पद्धतींमधील आमच्या सामूहिक कौशल्यांचा उपयोग करून UAlbany च्या सहकार्याने RISM संगणक विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय आणि नॅनोतंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये शिक्षणाला प्रगतीपथावर नेईल.विद्यापीठाचा मुख्य निवासी कॅम्पस बंगळुरूच्या देवनहळ्ळी जवळ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट रीजन (ITIR) मध्ये विकसित केला जात आहे. त्यामुळे ते एरोस्पेस पार्क, स्पेशल इकॉनॉमिक झोन, ग्लोबल फायनान्शियल डिस्ट्रिक्ट आणि प्रस्तावित फॉक्सकॉन फॅसिलिटी सारख्या महत्त्वाच्या औद्योगिक आणि नाविन्यपूर्ण केंद्रांच्या जवळ असेल.
